
Delhi Blast: दिल्ली किल्ल्याजवळ पुन्हा एकदा झाला मोठा ब्लास्ट! आतापर्यंत कधी - कधी हादरली दिल्ली? वाचा संपूर्ण घटनाक्रम
दिल्लीतील लाल किल्ली मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ आज सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये धमाका झाला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. धमाकीची तीव्रता एवढी जास्त होती की लाल किल्ल्याजवळ स्थित असलेल्या लाल मंदिरात गाडीचा एक भाग येऊन पडला. याशिवाय या ब्लास्टच्या तीव्रतेने मंदिराचे आरसे तुटले आणि जवळपास असलेल्या अनेक दुकांनांचे दरवाजे आणि खिडक्यांचे देखील नुकसान झाले होते. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३० लोकं जखमी झाल्याचे सांगितलं जात आहे.
हा ब्लास्ट झाल्यानंतर त्या परिसरातील दुकानांना त्वरित अलर्ट जारी करण्यात आला. चांदणी चौकातील भगीरथ पॅलेस परिसरातही ब्लास्टचे धक्के जाणवले आणि दुकानदार एकमेकांना फोन करून परिस्थितीची विचारपूस करताना दिसले. अनेक बसेस आणि इतर वाहनांना आग लागल्याचे वृत्त आहे. दिल्लीत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत अनेक वेळा दिल्ली ब्लास्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा घटनाक्रम जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
25 मे 1996: लाजपत नगर सेंट्रल मार्केटमध्ये स्फोट, सुमारे 16 लोकांचा मृत्यू
1 ऑक्टोबर 1997: सदर बाजारजवळ दोन ब्लास्ट, सुमारे 30 जण जखमी
10 ऑक्टोबर 1997: शांतिवन, कौडिया ब्रिज आणि किंग्जवे कॅम्प परिसरात तीन स्फोट, एकाचा मृत्यू आणि सुमारे 16 जण जखमी
18 ऑक्टोबर 1997: रानी बाग मार्केटमध्ये ब्लास्ट, एकाचा मृत्यु, सुमारे 23 जण जखमी
26 ऑक्टोबर 1997: करोल बाग मार्केटमध्ये दोन ब्लास्ट, एकाचा मृत्यु, सुमारे 34 जण जखमी
30 नोव्हेंबर 1997: रेड फोर्ट क्षेत्रात ब्लास्ट, 3 जणांचा मृत्यु, सुमारे 70 जण जखमी
18 जून 2000: रेड फोर्टच्या जवळ दोन शक्तिशाली स्फोट, दोघांचा मृत्यू, सुमारे 12 जण जखमी
16 मार्च 2000: सदर बाजारमध्ये स्फोट, सुमारे 7 जण जखमी
27 फेब्रवारी 2000: पहाड़गंज में विस्फोट — 8 जण जखमी
14 एप्रिल 2006: जामा मस्जिद प्रांगणमध्ये दोन स्फोट, कमीत कमी 14 जण जखमी
22 मे 2005: लिबर्टी आणि सत्यं सिनेमा हॉलमध्ये दोन स्फोट, एकाचा मृत्यु, सुमारे 60 जण जखमी
29 ऑक्टोबर 2005: सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुमध्ये तीन स्फोट, सुमारे 59 ते 62 लोकांचा मृत्यू, 100 हून अधिक जण जखमी
13 सप्टेंबर 2008: करोल बाग (गफ्फार मार्केट), कनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलाश-I मध्ये पाच समन्वित स्फोट, कमीत कमी 20 ते 30 लोकांचा मृत्यू, 90 हून अधिक जखमी
27 सप्टेंबर 2008: मेहरौलीच्या फुलांच्या बाजारात (सराई) स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी
25 मे 2011: दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही.