लखनौमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू तर पाचजण जखमी झाले आहेत. पोलिस आणि रुग्णवाहिकेलाही याबाबतची माहिती देण्यात आली.
स्फोट झाल्यानंतर कंपनीत मोठी आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या होत्या. स्फोटातील आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 11 गाड्या दाखल झाल्या होत्या.
स्फोट झालेल्या ठिकाणी पोलिस आणि अन्य बच्चाव यंत्रणा दाखल झाल्या आहेत. बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आलेले आहे. जखमी कामगारांना रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
Pakistan News Update: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा असीम मुनीर यांच्या सैन्याला लक्ष्य करण्यात आले आहे. शनिवारी कलाट जिल्ह्यातील मंगोचर धरण परिसरात सलग तीन स्फोटांमुळे गोंधळ उडाला.