New Delhi Hit and Run:
New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चाणक्यपुरी पोलिस ठाण्याच्या पॉश परिसरात एक मोठा अपघात घडला. राष्ट्रपती भवनापासून २ किमी अंतरावर एका थार कारने एका व्यक्तीला चिरडले. कारने धडक दिलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मृतदेह काही तास रस्त्यावरच पडला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून दुसऱ्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच पोलिसांनी संबंधित थार चालकाला ताब्यात घेतलं असून घटनेची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाणक्यपुरी पोलिस ठाण्यानुसार, ११ मुर्तीजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या थारने दोघांना धडक दिली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. टक्कर इतकी जोरदार होती की थारचे पुढचे चाक गाडीपासून वेगळे झाले. त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी थार चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित थारचालकाच्या कारमधून दारूच्या बाटल्या सापडल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यानंतर फॉरेन्सिक टीमकडून संपूर्ण वाहनाची तपासणी केली जात आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी थार चालक हा २६ वर्षीय तरुण असून तो जागीच पकडला गेला आहे. तो त्याच्या मित्राची थार घेऊन गेला होता. चौकशीदरम्यान त्याने सांगितले गाडी चालवताना त्याला अचानक झोप लागल्यामुळे हा अपघात आपल्याकडून घडला, कशी कबुलीही त्याने दिल्याचे सांगितले. त्यानंतर कारचालकाने दारू प्यायली होती की नाही याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, अवघ्या १० दिवसांपूर्वी आरोपी चालकाच्या गाडीचे जास्त वेगाने गाडी चालवल्यामुळे दंड आकारण्यातआला होता. वाहनाच्या तपासणीदरम्यान पोलिसांना संबंधित वाहनावर २ हजार रुपयांचा चलन आहे, जो अद्याप भरलेला नसल्याचेही आढळून आले आहे. याशिवाय पोलिसांच्या माहितीनुसार,संबंधित वाहनात फक्त चालक होता. तसेच ही थार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे नोंदणीकृत आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे, पोलिस पुरावे गोळा करत आहेत आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत आणि घटनेच्या प्रत्येक पैलूची कसून चौकशी केली जात आहे.
जळत्या चितेसमोर जाऊन महिलेचे लज्जास्पद कृत्य… लोक म्हणाले, ” अक्कल गहाण ठेवली का?”
काही काळापूर्वी जोधपूरमध्येही असाच अपघात घडला होता. बुधवारी (६ ऑगस्ट) जोधपूर शहरातील बालसमंद परिसरातील रॉयल्टी नाका चौकात एका वेगवान आणि अनियंत्रित डंपरने २ महिलांना चिरडले. या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाली, जिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.