Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest : दिल्ली पोलिसांचा CJP ला झटका! आंदोलनाची परवानगी नाकारली, केंद्राने सर्व राज्यांना दिले महत्वाचे निर्देश

CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर १० ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यानंतर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्यास आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सांगितले.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 09:14 PM
Delhi police CJP protest

Delhi police CJP protest

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली पोलिसांनी CJP च्या आंदोलनाला परवानगी नाकारली.
  • केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना दिल्ली पोलिसांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.
  • आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय वाढवण्यास सांगितले.
 

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर १० ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याच्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) प्रस्तावाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या निर्णयानंतर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी निर्देश दिले आहेत. (CJP Protest)

आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही CJP आणि तिचे समर्थक वेगवेगळ्या राज्यांतून दिल्लीमध्ये येण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी शक्यता गृह सचिवांच्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असं सांगण्यात आलं आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांचा नकार

दिल्ली पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी अधिकृत आदेश काढून CJP च्या आंदोलनासाठी केलेली विनंती फेटाळली. आवश्यक प्रक्रियेचं पालन न झाल्याचं कारण देतानाच, परिसरातील सभांबाबत सर्वोच्च न्यायालयाने २३ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निर्देशांचं पालन करणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी नमूद केलं.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

केंद्रीय गृह सचिवांचे सर्व राज्यांना निर्देश

केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून दिल्ली पोलिसांशी समन्वय साधण्यास सांगितलं आहे. संभाव्य गर्दी आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या चौकटीत राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गृह सचिवांच्या पत्रात CJP आणि तिच्या समर्थक संघटनांनी यापूर्वीच्या आंदोलनांदरम्यान कायदेशीर निर्देशांचं पालन न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं आणि सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचं नुकसान झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दिल्लीच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही काही समर्थक दिल्लीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याचा उल्लेख पत्रात आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गुप्तचर यंत्रणा, सीमावर्ती वाहतूक यंत्रणा आणि दिल्ली पोलीस यांच्यात सतत माहितीची देवाणघेवाण सुरू ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं संरक्षण आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी तातडीने आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही घटनात्मक जबाबदारी असल्याचं केंद्रीय गृह सचिवांनी पत्रात अधोरेखित केलं आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांतील यंत्रणांमध्ये समन्वय आणि सुरक्षा नियोजनाला महत्त्व देण्यात आलं आहे.

New Delhi : दिल्लीत इंटरनेट गुल्लं, मेट्रो सेवा मात्र कायम, गृहमंत्रायलयाने घेतला सीजेपीचा धसका

💡

Frequently Asked Questions

  • Que: CJP च्या जंतर-मंतरवरील आंदोलनाला परवानगी का नाकारण्यात आली?

    Ans: दिल्ली पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी अधिकृत आदेशाद्वारे आंदोलनाची विनंती फेटाळली. आवश्यक प्रक्रियेचं पालन न झाल्याचं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २३ जुलै २०१८ च्या निर्देशांचं पालन आवश्यक असल्याचं कारण देण्यात आलं.

  • Que: केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी राज्यांना कोणते निर्देश दिले?

    Ans: सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्ली पोलिसांशी समन्वय साधण्यास, सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास आणि गुप्तचर माहितीची सतत देवाणघेवाण ठेवण्यास सांगण्यात आलं.

  • Que: CJP चं आंदोलन कधी प्रस्तावित होतं?

    Ans: कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन १० ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रस्तावित होतं. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यासाठी परवानगी नाकारली आहे.

Web Title: Delhi police denies cjp protest permission october 10 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • CJP
  • CJP Protest
  • Delhi Police

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला
1

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द
2

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
3

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी
4

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.