Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janata Party Protest: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांची परवानगी

Cockroach Janata Party Protest: प्रसिद्ध शिक्षण सुधारक आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही ५ जूनपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास या आंदोलनात सामील होण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या आंदोलनाला मोठी धार मिळण्याची शक्यता असून, दिल्लीतील वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेवर पोलीस प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 06, 2026 | 10:04 AM
Cockroach Janata Party Protest, NEET Paper Leak Delhi, Abhijit Deepke CJP

Cockroach Janata Party Protest, NEET Paper Leak Delhi, Abhijit Deepke CJP

Follow Us
Follow Us:

 

Cockroach Janata Party latest update: दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीला (सीजेपी) जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. सीजेपीने आपल्या समर्थकांना जंतर मंतरवर शांततापूर्ण निदर्शनासाठी परवानगी मागण्याकरिता शनिवारी सकाळी ९ वाजता पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर जमण्याचे आवाहन केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी या आंदोलनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे प्रस्तावित निदर्शनासाठी कोणताही कायदेशीर अडथळा उरला नव्हता.

नीट (NEET) पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाचे नेतृत्व करणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके शनिवारी (६ जून) सकाळी अमेरिकेतील बोस्टन येथून नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Cockroach Janata Party Protest 6 june: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वी पक्षाकडून गाईडलाईन्स जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शांतता राखण्यासाठी मध्य दिल्लीचे १२ झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून, प्रत्येक झोनची जबाबदारी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच संवेदनशील भागांत १,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून आंदोलकांशी संघर्ष टाळत संवादाने परिस्थिती हाताळण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

दरम्यान, अभिजित दीपके यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत समर्थकांना पुस्तके आणि तिरंगा घेऊन जंतर-मंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. “आंदोलन प्रेम आणि शांततेने पुढे न्यायचे असून, सहानुभूतीचे प्रतीक म्हणून पोलिसांना फुले अर्पण करावीत,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील याचिकेवर ठरल्याप्रमाणे सुनावणी होईल, असे न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी आणि न्यायमूर्ती अमित शर्मा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

Atul Kulkarni : अभिनेत्याचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? म्हणाला ‘उद्याचा दिवस महत्वाचा! आम्ही अनेक चुका केल्या पण…’

प्रसिद्ध शिक्षण सुधारक आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही ५ जूनपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास या आंदोलनात सामील होण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या आंदोलनाला मोठी धार मिळण्याची शक्यता असून, दिल्लीतील वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेवर पोलीस प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.

 

सीजेपीच्या आंदोलन स्थळी सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वाहनांची तपासणी केली जात आहे. जंतर मंतरच्या जवळ कुठेही पार्किंगला बंदी आहे. वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. एनडीएमसी परिसराचे छावणीत रूपांतर झाले आहे. वाहतूक पोलीस दुचाकींवरून गस्त घालत आहेत. खास बाब म्हणजे, ‘जनरेशन झेड’ला ज्येष्ठांकडूनही मोठा पाठिंबा मिळाल्याचे दिसत आहे.

 

Web Title: Delhi police grant permission for the cockroach janata partys protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 10:04 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.