Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 19, 2024 | 12:21 PM
भारतीय तटरक्षक दलाचे संचालक राकेश पाल

भारतीय तटरक्षक दलाचे संचालक राकेश पाल

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव आज दिल्ली आणले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (18 ऑगस्ट) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चेन्नईत आले होते. याठिकाणी तटरक्षक दलाच्या सागरी बचाव केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार होते. याबाबत राकेश पाल चेन्नईत तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत होते. बैठकीदरम्यान त्यांना अचानक अवस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला

राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट करत म्हटले आहे की, “चेन्नई येथील भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. ते एक सक्षम आणि वचनबद्ध अधिकारी होते, त्यांच्या नेतृत्वाखाली ICG भारताची सागरी सुरक्षा मजबूत करण्यात मोठी प्रगती करत होते. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे.” तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हॉस्पिटलला भेट देऊन राकेश पाल यांना श्रद्धांजली वाहिली.

Deeply saddened at the untimely demise of Shri Rakesh Pal, DG, Indian Coast Guard in Chennai today. He was an able and committed officer under whose leadership ICG was making big strides in strengthening India’s maritime security. My heartfelt condolences to his bereaved family.

— Rajnath Singh (@rajnathsingh) August 18, 2024


भारतीय नौदलाने शोक व्यक्त केला

त्याचवेळी भारतीय नौदलानेही राकेश पाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भारतीय नौदलाने म्हटले आहे की, “नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्यासह भारतीय नौदलाच्या सर्व सदस्यांनी महासंचालक राकेश पाल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत आहोत. भारतीय नौदलाने त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखाच्या प्रसंगी भारतीय नौदल त्यांच्या कुटुंबासोबत आहे.’

Adm Dinesh K Tripathi #CNS and all personnel of #IndianNavy express profound grief & heartfelt condolences on the untimely demise of Director General Rakesh Pal, @IndiaCoastGuard.
Indian Navy stands in grief with the bereaved family. https://t.co/f0fvpnI4gV

— SpokespersonNavy (@indiannavy) August 18, 2024

कोण होते राकेश पाल?

राकेश पाल हे मूळचे उत्तर प्रदेशाचे रहिवासी होते. 2023 मध्ये त्यांची भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) चे 25 वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी होते. राकेश पाल हे जानेवारी 1989 मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले होते. त्यांनी द्रोणाचार्य, इंडियन नेव्हल स्कूल, कोची आणि यूकेमधील इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन कोर्समधून तोफखाना आणि शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये व्यावसायिक कौशल्य प्राप्त केले. त्यांनी कोस्ट गार्ड मुख्यालय, ICGS विजित, ICGS सुशेथा कृपलानी, ICGS अकालीबाई आणि ICGS येथे संचालक म्हणून आणि प्रधान संचालक अशी विविध प्रतिष्ठित पदे भूषवली आहेत. तसेच त्यांनी आईसीजीएस सी-03 चे देखील नेतृत्व संभाळले होते.

Web Title: Director general of indian coast guard rakesh pal passed away due to heart attack nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • chennai
  • Indian Coast Guard

संबंधित बातम्या

भारतीय तटरक्षक दल सहाय्यक कमांडंट भरती 2025: 2027 बॅचसाठी मोठी संधी, लवकर करा अर्ज
1

भारतीय तटरक्षक दल सहाय्यक कमांडंट भरती 2025: 2027 बॅचसाठी मोठी संधी, लवकर करा अर्ज

याला म्हणतात दिलदार कंपनी ! ‘या’ खास कारणामुळे कर्मचाऱ्यांना दिल्या कस्टमाईज Hyundai Creta
2

याला म्हणतात दिलदार कंपनी ! ‘या’ खास कारणामुळे कर्मचाऱ्यांना दिल्या कस्टमाईज Hyundai Creta

चेन्नई विमानतळावर टळली मोठी दुर्घटना; थोडक्यात बचावले १८० प्रवासी, लँडिंगवेळी नक्की काय घडलं?
3

चेन्नई विमानतळावर टळली मोठी दुर्घटना; थोडक्यात बचावले १८० प्रवासी, लँडिंगवेळी नक्की काय घडलं?

आता पाण्याची चिंता मिटली! समुद्राचं खारं पाणी फिल्टर करता येणार; DRDO च्या प्रयत्नांना मोठं यश
4

आता पाण्याची चिंता मिटली! समुद्राचं खारं पाणी फिल्टर करता येणार; DRDO च्या प्रयत्नांना मोठं यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.