
पुण्याच्या सार्थक चव्हाणला उपविजेतेपद
चेन्नई येथे पार पडलेल्या या तिसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक थरारक ठरलेल्या ‘सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी ओपन’ गटात बंगळुरूच्या चिरांत विश्वनाथने बाजी मारली. त्याने आपला कट्टर प्रतिस्पर्धी आणि ‘पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग’मधीलच संघसहकारी सार्थक याला मागे टाकत सलग दुसऱ्या दिवशी अव्वल स्थान मिळवून दुहेरी विजय नोंदवला. सार्थकने या फेरीतील दोन्ही शर्यतींमध्ये दुसरा क्रमांक मिळवला.
Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार
सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ही शर्यत निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू करण्यात आली. केवळ ६ लॅप्सच्या या छोट्या अंतराच्या शर्यतीत देशातील अव्वल रायडर्समध्ये प्रत्येक सेकंदासाठी तीव्र चुरस पाहायला मिळाली. शनिवारी झालेल्या पहिल्या शर्यतीत चिरांतने विक्रमी लॅप वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला, तर सार्थकने दुसरा क्रमांक पटकावला. याच शर्यतीत मोहम्मद मिकैल याने तिसरा आणि रक्षित दवे याने चौथा क्रमांक मिळवला.
दुसऱ्या दिवशीच्या शर्यतीतही सार्थक आणि चिरांत यांच्यात सुरुवातीपासूनच अटीतटीचा संघर्ष रंगला होता. शर्यतीच्या अत्यंत निर्णायक आणि शेवटच्या टप्प्यात चिरांतने सार्थकला चकवत अनपेक्षित आघाडी घेतली. या तीव्र वळणावर सार्थकचे गाडीवरील नियंत्रण काही क्षणांसाठी विचलित झाले आणि त्याची हीच चूक त्याला आघाडी गमावण्यास कारणीभूत ठरली. अखेर चिरांतने बाजी मारत या विकेंडमधील आपला सलग दुसरा विजय साकारला, तर सार्थकला पुन्हा एकदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.
सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सार्थकने ‘सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी ओपन’ या मुख्य गटात सलग दोन विजय मिळवून दुहेरी मुकुट पटकावला होता. तसेच पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या ‘इलेक्ट्रिक आरटीई’ या गटातही अव्वल क्रमांक पटकावून तिहेरी यश संपादन केले होते. सार्थक चव्हाण हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाचे धडे गिरवत असून, त्याला फिटनेस कोच मिहीर तेरणीकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
Ans: मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज’ २डब्लू-२०२६ स्पर्धा पूर्ण झाली.
Ans: पुण्याच्या सार्थक चव्हाण एमआरएफ रेसिंग स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.