बिहारमध्ये कॉंग्रेससाठी 'करो या मरो' ची स्थिती; गेल्या १० निवडणुकांमधील आकडेवारी टेन्शन वाढवणारी
बिहारमध्ये 2025 च्या अखेरीस विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. मात्र या वेळी ही निवडणूक काहीस वेगळी ठरणार आहे. विशेषतः काँग्रेससाठी. बिहारच्या राजकारणात गेल्या तीन-चार दशकांपासून कमकूवत बनलेल्या कॉंग्रेसला कॉंग्रेस पक्ष आता नावापुरताच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे कॉंग्रेससाठी “करो या मरो” अशी असणार आहे. काँग्रेसच्या पुढील वाटचालीसाठीही ही निवडणूक निर्णाय ठरण्याची शक्यता आहे.
बिहार हे पूर्व भारतातील एक अत्यंत राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि जटील राज्य आहे. जातीय समीकरणे, सामाजिक धृविकरण आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे कोणत्याही पक्षासाठी स्वामित्व टिकवणं आव्हानात्मक राहिलं आहे. काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष जो एकेकाळी बिहारच्या सत्ता-सिंहासनावर आरूढ होता, तो आज अगदीच दुय्यम पक्ष बनून राहिला आहे. दरम्यान मागील 10 विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा प्रवास कसा राहिला, त्याचे कोणते राजकीय परिणाम झाले? आगामी निवडणुकीत कोणते धोके आणि कुठे संधी आहे. याविषयी जाणून घेऊया…
मागील 10 निवडणुकांचे निकाल आणि कॉंग्रेसची स्थिती
1. बिहार विधानसभा निवडणूक 2020
गठबंधन – महागठबंधन (RJD, काँग्रेस)
काँग्रेस लढलेल्या जागा: 70
विजय : 19
RJD: 75, BJP: 74, JDU: 43
सरकार: NDA (JDU-BJP), मुख्यमंत्री – नीतीश कुमार
काँग्रेसने 70 जागांवर लढून फक्त 19 जागा मिळवल्या, याचा अर्थ 73% जागांवर पराभव. हे पराभव एकतर उमेदवारांची निवड चुकीची होती किंवा काँग्रेसची जमीनी पातळीवरील घडी अजूनही विस्कळीत आहे.
2. 2015 विधानसभा निवडणूक
गठबंधन – महागठबंधन (RJD, JDU, काँग्रेस)
काँग्रेस लढलेल्या जागा: 41
विजय : 27
RJD: 80, JDU: 71, BJP: 53
सरकार: महागठबंधन, मुख्यमंत्री – नीतीश कुमार
हा काँग्रेससाठी थोडा सकारात्मक टप्पा होता. एकूण 41 पैकी 27 जागांवर विजय, म्हणजेच 66% विजयदर. हे महागठबंधनाच्या एकत्रित रणनीतीचे फलित होते.
3. 2010 विधानसभा निवडणूक
स्वतंत्र लढत
काँग्रेस लढलेल्या जागा: 243 (सर्व)
विजय : 4
ही काँग्रेससाठी भीषण हार होती. स्वतंत्र लढतीत जास्तीत जास्त जागांवर प्रयत्न करून देखील केवळ 4 जागांवर यश मिळाले. याचा अर्थ असा की पक्षाची जनतेत पकड जवळपास संपली होती.
4. 2005 (फेब्रुवारी)
काँग्रेस लढलेल्या जागा: 84
जिंकल्या: 10
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फेरनिवडणुका
लढलेल्या जागा: 51
विजय : 9
दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी सुमार होती. बहुमत कुणालाच मिळाले नाही, परंतु नंतरच्या निवडणुकीत JDU-BJP युतीने सत्ता स्थापन केली. काँग्रेसची ताकद दुबळी राहिली.
5. 2000 विधानसभा निवडणूक
लढलेल्या जागा: 324
विजय : 23
हा टप्पाही काँग्रेससाठी निराशाजनक होता. बहुसंख्य जागांवर लढूनदेखील केवळ 23 जागा जिंकल्या. त्या वेळी राबडी देवी मुख्यमंत्री बनल्या, पण काँग्रेसची भूमिका गौण होती.
6. 1995 विधानसभा निवडणूक
लढलेल्या जागा: 320
विजय : 29
हा काँग्रेससाठी आणखी एक दुष्काळी कालखंड होता. RJD उदयाला येत होती आणि काँग्रेस मागे पडत होती.
7. 1990 विधानसभा निवडणूक
लढलेल्या जागा: 323
विजय : 71
विश्लेषण: काँग्रेस अजूनही थोडीशी बळकट होती, पण याच निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली RJD एक प्रबळ शक्ती म्हणून समोर आली.
8. 1985 विधानसभा निवडणूक
लढलेल्या जागा: 323
विजय : 196
हे काँग्रेससाठी सुवर्णयुग होते. बहुमत मिळवत काँग्रेसने सत्तेत पुनरागमन केले होते. पण यानंतर बिहारमध्ये कॉंग्रेसला उतरतीकळा लागत गेली.
9. 1980 विधानसभा निवडणूक
काँग्रेस (इ): 169
काँग्रेस (यू): 14
इंदिरा गांधींच्या प्रभावामुळे काँग्रेसला चांगले यश मिळाले. मात्र या यशाचा आनंद फारकाळ टीकला नाही.
10. 1977 विधानसभा निवडणूक
विजय : 57 (286 पैकी)
जेपी आंदोलनाच्या प्रभावामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला. हा काळ काँग्रेसच्या उतरत्या काळाची सुरुवात होती.
Shrikant Shinde : “राजकारणात राहुल गांधी खूपच अपरिपक्व…”, श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका
काँग्रेसच्या गळतीची प्रमुख कारणे
1. संगठनात्मक कमजोरी
बिहारमध्ये काँग्रेसचा पक्षरचना फारच कमकुवत आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची कमतरता आणि जिल्हा पातळीवर स्पष्ट नेतृत्वाचा अभाव आहे.
2. प्रभावी नेतृत्वाचा अभाव
सुप्रिया श्रीनेत किंवा शक्ती सिंह गोहिलसारखे राष्ट्रीय चेहरे असले तरी स्थानिक नेतृत्वाची विश्वासार्हता आणि लोकसंपर्क नाही.
3. गठबंधनांवरील अतिनिर्भरता
RJD किंवा JDUसारख्या पक्षांबरोबर लढून काँग्रेसने आपली स्वतंत्र ओळख गमावली आहे. मतदार आता काँग्रेसकडे स्वतंत्र पर्याय म्हणून पाहत नाहीत.
4. मतदानाची जातीय समीकरणे
बिहारमध्ये जातीय धृविकरण अत्यंत प्रभावी आहे, आणि काँग्रेसने आपल्या पारंपरिक मतदार घटकांचा (दलित, मुस्लिम, सवर्ण मध्यमवर्ग) विश्वास गमावला आहे.
2025 ची विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी अंतिम संधी ठरू शकते. जर पक्ष या निवडणुकीत आपली ताकद पुन्हा दाखवू शकला, तर भविष्यात तो एक ‘किंगमेकर’ म्हणून भूमिका बजावू शकतो. अन्यथा, हा बिहारमधून काँग्रेसच्या अस्तित्वाचा शेवट ठरू शकतो. बिहारसारख्या राज्यात राजकारण नेहमीच बहुपक्षीय आणि अनिश्चिततेने भरलेलं असतं. काँग्रेससाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. जर त्यांनी यावेळी योग्य धोरण, नेतृत्व