एलॉन मस्क यांचे वडील एरॉल रामलल्लांच्या दर्शनानंतर भावूक; वेदांबद्दल काय म्हणाले? एकदा ऐकाच
जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांनी बुधवारी दुपारी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. या अनुभवाचे वर्णन त्यांनी अद्भुत आणि माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रसंग असं केलं आहे. राम मंदिराबरोबरच त्यांनी जवळील हनुमानगढी मंदिरालाही वंदन केले. एरोल मस्क आपल्या मुलगी अलेक्झांड्रा मस्कसोबत दुपारी सुमारे २.३० वाजता अयोध्या विमानतळावर पोहोचले. सुमारे ४ वाजेपर्यंत त्यांनी राम मंदिरात दर्शन घेतलं. त्यांनी भारतीय पारंपरिक पोशाख म्हणजेच कुर्ता-पायजमा परिधान केला होता. त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
टाटा ग्रुपचा शेअर ६०० रुपयांपर्यंत घसरेल? ब्रोकरेजने दिले ‘SELL’ रेटिंग
यावेळी एरॉल मस्क म्हणाले, “ही भेट खरोखरच अद्भुत होती. मी अत्यंत आनंदी आहे की मी इथे आलो. जेव्हा संपूर्ण मंदिर पूर्ण होईल तेव्हा जगातील आश्चर्यांपैकी एक होईल, अशी मला खात्री आहे. भारतामधील माझा अनुभव अतिशय छान आहे. मी येथे सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम्स लि. या कंपनीसोबत काम सुरू करण्यासाठी आलेलो आहे. भारतात बराच काळ घालवण्याची माझी इच्छा आहे. इथली मंदिरंही अद्वितीय आहेत आणि लोकही अत्यंत आपुलकीने वागतात”
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत आधीपासूनच त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. यामध्ये ड्रोनविरोधी अत्याधुनिक प्रणाली, सीसीटीव्ही देखरेख, पर्यटकांची नियमित तपासणी आणि विशेष प्रशिक्षण घेतलेल्या सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. एरॉल मस्क यांच्या भेटीसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही, कारण सध्याची सुरक्षा यंत्रणा पुरेशी आहे,” असंही एका पोलिस अधिकार्याने सांगितलं.
येस बँकेची मोठी घोषणा, १६,००० कोटी रुपये उभारण्यास मान्यता; शेअर्स वधारले
एरॉल मस्क हे हरियाणास्थित सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम्स लि. चे ग्लोबल सल्लागार (Global Advisor) आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एरॉल यांचा भारत दौरा १ जून रोजी सुरू झाला असून, तो ६ जूनपर्यंत असणार आहे. त्यांच्या या भेटीचे मुख्य उद्दिष्ट भारतातील हरित तंत्रज्ञान (Green Technology) आणि विद्युत वाहन (EV) चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाला गती देणे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.या दौऱ्यात सर्वोटेकचे व्यवस्थापकीय संचालक रमन भाटिया हे देखील राम मंदिरास भेट देणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
भारताचा इतिहास अविश्वसनीय आहे. जगाचा इतिहास कोणत्या ना कोणत्या मार्गे भारताशी जोडलेला आहे, असं मला वाटतं. वेद १४ हजार वर्षे जुने असल्याचं सांगितलं जातं, मात्र ते त्याही आधीचे आहेत. वेदांमध्ये विमानांचा उल्लेख आहे. हे सगळं खूप आकर्षक आणि अविश्वसनीय असं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.