Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुलींना रात्री बाहेर जाऊ देऊ नका’, सामूहिक बलात्कारावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान; तर सरकारला….!

Mamata Banerjee on Durgapur Gangrape: रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिकरित्या वादग्रस्त टिप्पणी करताना, "मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर पडू देऊ नये," असे विधान केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 12, 2025 | 03:41 PM
सामूहिक बलात्कारावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान (Photo Credit- X)

सामूहिक बलात्कारावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘मुलींना रात्री बाहेर जाऊ देऊ नका’
  • सामूहिक बलात्कारावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान
  • तर सरकारला….!

कोलकाता: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या (Gangrape) प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आपले मौन सोडले आहे. रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिकरित्या वादग्रस्त टिप्पणी करताना, “मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर पडू देऊ नये,” असे विधान केले.

सरकारला जबाबदार धरणे अयोग्य

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संवेदनशील प्रकरणावर भाष्य करताना सरकारचा बचाव केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणात सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. “हा खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय आहे, त्यामुळे विद्यार्थिनीची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी कॉलेज प्रशासनाची होती, सरकारची नाही,” असे मत त्यांनी मांडले.

“Girls should not be allowed to go outside of college at night”: Mamata Banerjee on Durgapur gangrape Read @ANI Story | https://t.co/XrAiEnQaSK#MamataBanerjee #Durgapur #WestBengal pic.twitter.com/CLWGuXxq3F — ANI Digital (@ani_digital) October 12, 2025

West Bengal Violence: वक्फ कायद्यावरून बंगाल पेटलं; हिंदू कुटुंबे…; हिंसाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

काय आहे नेमके प्रकरण?

ही घटना पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथील एका खासगी मेडिकल कॉलेज परिसराजवळ घडली. ओडिशाची रहिवासी असलेली पीडित विद्यार्थिनी रात्री तिच्या एका मैत्रिणीसोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेली होती. याचदरम्यान, तीन अज्ञात लोकांनी मेडिकल कॉलेज जवळ थांबवले, त्यानंतर तिला जगंलात घेवून जावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, घटनेच्या वेळी पीडितेचा मैत्रिणीने घटनास्थळावरून पळून गेला होता.

पोलिसांची तात्काळ कारवाई: तीन आरोपींना अटक

या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत रविवारी तीन आरोपींना अटक केली आहे. याव्यतिरिक्त, एका संशयित व्यक्तीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींची चौकशी सुरू असून, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिन्ही आरोपींचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.

गुन्हास्थळी शोधमोहीम सुरू

तपास अधिकाऱ्यांनी परानागंज काली बाडी स्मशानभूमीला लागून असलेल्या जंगल परिसरात रविवारी घेराव घातला. पोलीस दुर्गापूर येथील खासगी मेडिकल कॉलेजच्या आसपासच्या गावांमध्येही मोठी शोधमोहीम राबवत आहेत. पुरावे आणि संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरातील जंगलात ड्रोनचा वापर देखील केला जात आहे. पीडितेचे आई-वडील ओडिशा येथून दुर्गापूरला पोहोचले असून, त्यांनी ‘न्यू टाऊनशिप’ पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केली आहे. पीडितेवर ती शिक्षण घेत असलेल्या खासगी कॉलेज आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सुधारत असून, तिने पोलिसांना आपला जबाबही नोंदवला आहे.

पश्चिम बंगालमध्ये गुंडा राज? दगड, काठ्या घेऊन BJP नेत्यावर प्राणघातक हल्ला; Video बघून म्हणाल…

Web Title: Dont let girls go out at night mamata banerjees controversial statement on gang rape

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • gang raped
  • Kolkata
  • Mamta Banarjee
  • West bengal

संबंधित बातम्या

West Bengal Crime: MBBS विद्यार्थीनीवर तिघांकडून निर्घृण सामूहिक बलात्कार; जंगलात ओढत नेऊन केला अत्याचार
1

West Bengal Crime: MBBS विद्यार्थीनीवर तिघांकडून निर्घृण सामूहिक बलात्कार; जंगलात ओढत नेऊन केला अत्याचार

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार
2

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार

पश्चिम बंगालमध्ये गुंडा राज? दगड, काठ्या घेऊन BJP नेत्यावर प्राणघातक हल्ला; Video बघून म्हणाल…
3

पश्चिम बंगालमध्ये गुंडा राज? दगड, काठ्या घेऊन BJP नेत्यावर प्राणघातक हल्ला; Video बघून म्हणाल…

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त
4

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.