Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मृती इराणींवर टीका बंद करा ; राहूल गांधींनी काँग्रेस नेत्यांना भरला दम

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या माजी खासदार स्मृती इराणी यांच्या टीका टीपण्ण्या संपूर्ण देशाने पाहिल्या. अनेकदा स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर अत्यंत गलिच्छ आरोपही केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 12, 2024 | 04:39 PM
Photo Credit : Team Naveashtra

Photo Credit : Team Naveashtra

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या माजी खासदार स्मृती इराणी यांच्या टीका टीपण्ण्या संपूर्ण देशाने पाहिल्या. अनेकदा स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर अत्यंत गलिच्छ आरोपही केले.  लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राहूल गांधींवर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. पण आता राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील नेत्यांना स्मृती इराणींवर असभ्य भाषेत टीका करणाऱ्यांना अक्षरश: दम भरला आहे.

यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावर असभ्य आणि अशोभनीय भाषेत टीका करू  नये. आयुष्यात हार-जीत होत असते, पण एखाद्याचा अपमान करणे हे ताकदीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीताना त्यांनी आपल्या नेत्यांना  समजावण्याचा प्रयत्न केला आहे.   स्मृती इराणी यांच्याबद्दल कोणत्याही काँग्रेस नेत्याने चांगले-वाईट बोलू नये. लोकांचा अपमान करणे हे ताकदीचे नव्हे तर दुर्लभतेचे लक्षण आहे. त्यामुळे असे वागणे टाळा, असा सल्लाच राहुल गांधींनी दिला आहे. पण त्यांच्या या भूमिकेमागचे कारण काय असू शकते, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणी यांना सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात होते. या जागेवरून काँग्रेस नेते किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. यावेळी स्मृती इराणी अमेठीमधून पराभूत झाल्यामुळे त्यांना ट्रोल केले जाऊ लागले. बंगला रिकामा करण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांना लक्ष्य करण्यात आले.

राहुल गांधींच्या पोस्टवर प्रतिक्रिया

राहुल गांधींनी सोशल मीडियावर टाकलेल्या आवाहनात्मक पोस्टवर युजर्स आणि त्यांच्या समर्थकांकडूनही कमेंट करण्यात आल्या. एका यूजरने लिहिले की, ‘बरोबर आहे सर, पण हे लोक तुमच्या आणि आमच्याबद्दल जास्त भयानक गोष्टी बोलायचे. तरीही तुम्ही बोललात हे बरे झाले.  तर ‘राहुल गांधीजी बरोबर होते. लोकांनी स्त्रीला संबोधित करताना सावधगिरी बाळगावी, राजकीय मतभेद कोणाची तरी बदनामी किंवा मानहानी करण्यास परवानगी देत ​​नाहीत. नैतिक मूल्ये जपताना राजकीय मतभेदांवर नेहमीच टीका केली पाहिजे.’ अशी कमेंट दुसऱ्या  यूजरने केली आहे.

Web Title: Dont talk rudely about smriti irani rahul gandhis advice to congress leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 04:33 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Smruti Irani

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.