Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल

अरुणाचल प्रदेशातील ताक्तसिंग सीमावर्ती भागात चीनने भारताची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी राहुल गांधी संसदेत हा मुद्दा मांडणार का, असा सवाल केला.

  • By विवेक
Updated On: Jul 08, 2026 | 05:16 PM
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Follow Us
Follow Us:

अरुणाचल प्रदेशातील ताक्तसिंग (Taktsing) सीमावर्ती भागात चीनने भारताची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बुधवारी (८ जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा सरकारसमोर ठामपणे मांडणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारत अमेरिकेशी आंधळेपणाने करार करत असून त्याचवेळी अरुणाचल प्रदेशातील ताक्तसिंग भागात चीनने भारताच्या ताब्यातील जमीन बळकावली आहे. २०२० पर्यंत भारतीयांच्या ताब्यात असलेल्या या भागात आता भारतीय नागरिकांनाही प्रवेश करता येत नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अरुणाचल प्रदेशातील Nah Welfare Society या संस्थेने २६ जून २०२६ रोजी सुबनसिरी जिल्ह्याच्या उपायुक्तांना पत्र लिहून चीनच्या कथित घुसखोरीचा तपशील दिला आहे.

‘हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले’; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

सरकार गप्प का? मोदी सरकारवर थेट निशाणा

प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला की, या प्रकरणाची माहिती गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाला असूनही दोन्ही मंत्रालयांनी मौन बाळगले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लाल डोळे दाखवण्याची’ भाषा करतात, मग आता चीनच्या या कथित कारवाईवर सरकार गप्प का आहे?” असा सवाल त्यांनी केला. तसेच चीनने संबंधित भागात लष्करी बंकर आणि हेलिपॅड उभारल्याचाही दावा त्यांनी केला.

भारत जिस तरह अमेरिका से डर रहा है और अमेरिका के साथ अंधाधुंध समझौता कर रहा है। उसी तरह से अरुणाचल प्रदेश के सीमा पर ताकसिंग इलाके में 2020 से जो जमीन भारत के पास थी। अब वहां सब इलाके पर चीन ने कब्जा कर लिया है। वहां पर भारतीय लोग नहीं जा सकते। यह बात अरुणाचल प्रदेश के ताकसिंग की… pic.twitter.com/CoRNAKCsyK — Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) July 8, 2026

राहुल गांधी संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार?

प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही प्रश्न विचारला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अरुणाचल प्रदेशातील कथित चिनी घुसखोरीचा मुद्दा प्राधान्याने मांडून सरकारकडून उत्तर मिळेपर्यंत सभागृहाचे कामकाज रोखण्याची भूमिका राहुल गांधी घेणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राम मंदिरातील हिशेबाची SIT कडून पडताळणी; 124 कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

भाजप आणि केंद्र सरकारने खुलासा करावा

या प्रकरणी भाजप, आरएसएस आणि केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चीनने भारताची जमीन ताब्यात घेतल्याच्या आरोपांबाबत सरकारने देशाला सत्य सांगितले पाहिजे. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Prakash ambedkar alleges china encroached indian land in arunachal taktsing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • India china Border Clash
  • PM Narendra Modi
  • Prakash Ambedkar
  • Rahul Gandhi
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
2

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
3

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
4

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.