flight
विमानात एका महिलेवर लघुशंका केल्याचा (Urinate in Flight) घाणेरडा प्रकार काही महिन्यापुर्वी समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला मुंबईतुन अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरुन मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत होता. आता पुन्हा एकदा अशीच संताप आणणारी घटना घडली आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या (american airlines) न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये (New york New Delhi) एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली.
[read_also content=”इंडोनेशियात भीषण दुर्घटना! जकार्तामधे तेल डेपोला भीषण आग; 17 ठार, अनेक जखमी https://www.navarashtra.com/world/17-killed-in-fire-at-oil-depot-in-jakarta-indonesia-nrps-373864.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात सहप्रवाशावर लघुशंका केल्याची आणखी एक लाजिरवाणी घटना फ्लाइट क्रमांक AA292 मध्ये घडली. शुक्रवारी रात्री 9:16 वाजता या विमानाने न्यूयॉर्कहून उड्डाण केले आणि 14 तास 26 मिनिटांच्या उड्डाणानंतर शनिवारी रात्री 10:12 वाजता येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरले.
विमानतळावरील सूत्रांनी सांगितले की, आरोपी अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तो म्हणाला की विद्यार्थ्याने माफी मागितल्यानंतर, पीडित पुरुष पोलिसांकडे तक्रार करण्यास टाळाटाळ करत होता कारण यामुळे त्याचे करियर धोक्यात येऊ शकते. मात्र, विमान कंपनीने घटनेच गांभीर्य लक्षात घेता याबद्दल आयजीआय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) कळवले.
दरम्यान, विमानातील क्रूला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली ज्याने एटीसीला ही बाब कळवली, त्यांनी सीआयएसएफ कर्मचार्यांना याबद्दल कळवल्यानंतर, त्यांनी आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी सीआयएसएफसह एअरलाइनचे स्वतःचे सुरक्षा पथक हजर होते. विमान उतरताच आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आता पोलिस संबंधितांचे जबाब नोंदवत आहेत.
नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, जर एखादा प्रवासी अनियंत्रित वर्तनासाठी दोषी आढळला, तर त्याला/तिला गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई व्यतिरिक्त, गुन्ह्याच्या पातळीनुसार विशिष्ट कालावधीसाठी उड्डाण करण्यास बंदी घालण्यात येईल. मद्यधुंद अवस्थेत प्रवाशाने सहप्रवाशासोबत असे वर्तन केल्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.