Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teachers News: खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने देशभरातील 27 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 6 संस्थांमधून 45 शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2025 | 02:35 AM
Teachers News: खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

1. महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
2. शिक्षक दिनादिवशी पुरस्कारांचे वितरण केले जाणार
3. उच्च शिक्षणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर केले असून, महाराष्ट्रातील चार शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट योगदानामुळे हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केला आहे. शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधन आणि सामाजिक योगदानाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली आहे. हा पुरस्कार 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर 

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने देशभरातील 27 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 6 संस्थांमधून 45 शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड येथील जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धपूर येथील डॉ. शेख मोहम्मद वकुओद्दीन शेख हमीदोद्दीन आणि लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ आर्टमधील डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे यांचा समावेश आहे. या दोन्ही शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या समर्पित कार्यामुळे हा पुरस्कार मिळवला आहे. निवड प्रक्रिया पारदर्शी आणि कठोर स्वरूपाची असून, ती जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर 23 जून ते 20 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पार पडली. एकूण 45 पुरस्कार विजेत्यांपैकी 24 पुरुष आणि 21 महिला शिक्षकांचा समावेश आहे.

उच्च शिक्षणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर 

उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यंदाचे वर्ष म्हणजेच  2025 साठी देशभरातील 21 शिक्षकांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईतील शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नीलाक्षी जैन आणि बारामती येथील एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्रा. पुरुषोत्तम पवार यांचा समावेश आहे.

खुशखबर! विद्यापीठाशी संबंधित ५६ ऑनलाइन सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वर्ष 2020 नुसार, उच्च शिक्षणातील प्रेरक आणि सक्षम प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2023 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. निवड प्रक्रियेत अध्यापन परिणामकारकता, समाजाभिमुख उपक्रम, संशोधन, नवोन्मेष आणि प्रायोजित संशोधन यासारख्या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. डॉ. जैन आणि प्रा. पवार यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन आणि सामाजिक योगदानामुळे हा पुरस्कार प्राप्त केला आहे.

Web Title: Government of india announced the national teacher award 2025 to four teachers from maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • awarded
  • Maharashtra Government
  • New Delhi
  • Teacher

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “शहरी विकास आराखडा राबविताना पुढील…”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis: “शहरी विकास आराखडा राबविताना पुढील…”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis: “… या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis: “… या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis: “जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…”; CM फडणवीसांचे निर्देश
4

Devendra Fadnavis: “जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…”; CM फडणवीसांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.