Election commission doubt Tejashwi Yadav epic number as fake bihar elections 2025
बिहार : बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. मात्र त्यापूर्वीच बिहारचे राजकारण जोरदार रंगले आहे.निवडणुकीच्या उत्साहात, शनिवारी राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारच्या प्रारूप मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याचा दावा केला. यामुळे फक्त बिहारमध्ये नाही तर संपूर्ण देशभरामध्ये चर्चांना उधाण आले. तेजस्वी यादव यांनी आता मी मतदान कसे करु आणि निवडणूक कशी लढवू असे सवा उपस्थित करत आक्रमक पवित्रा घेतला. मात्र तेजस्वी यादव यांच्या आरोपांनंतर आता निवडणूक आयोग देखील एक्शन मोडमध्ये आली आहे. निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्या मतदान कार्डबाबत तपास सुरु केला आहे.
तेजस्वी यादव यांनी त्यांचे नाव मतदार यादीतून नाव वगळल्याचा दावा केल्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला. मात्र निवडणूक आयोगाने त्यांचे हे आरोप फेटाळले असून सार्वजनिकरित्या नाकारले आहेत. तेजस्वी यादव यांचे आरोप हे निराधार असून मतदारांची दिशाभूल करणारे असल्याचे देखील निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की जेव्हा त्यांनी मतदार यादीत त्यांचे नाव शोधले तेव्हा त्यांनी EPIC क्रमांक RAB2916120 प्रविष्ट केला तेव्हा “नो रेकॉर्ड्स फाउंड” असे लिहिले होते. त्यांनी ही प्रक्रिया स्क्रीनवर लाईव्ह दाखवली आणि म्हटले की हे लोकशाहीसाठी धोकादायक लक्षण आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आयोगाकडून सडेतोड उत्तर
तेजस्वी यादव यांनी केलेल्या मोठ्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने ताबडतोब कारवाई केली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने त्यांना सडेतोड उत्तर देखील दिले आहे. तेजस्वी यादव यांचे नाव मसुदा मतदार यादीत EPIC क्रमांक RAB0456228 अंतर्गत अनुक्रमांक 416 वर नोंदवले गेले आहे. आयोगाने असेही सांगितले की त्यांनी 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 2015 च्या मतदार यादीत हाच क्रमांक वापरला होता.
बनावट क्रमांकाची चौकशी सुरू
तेजस्वी यादव यांनी शेअर केलेल्या EPIC क्रमांक RAB2916120 बद्दल आयोगाने शंका व्यक्त केली आहे. आयोगाचे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षांत या क्रमांकाशी संबंधित कोणताही रेकॉर्ड सापडला नाही आणि त्याची सत्यता तपासली जात आहे. हा क्रमांक बनावट असण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हे दुसरे कार्ड कधीही अधिकृत प्रक्रियेद्वारे बनवले गेले नसण्याची शक्यता आहे. हा क्रमांक बनावट कागदपत्र आहे की नाही याची सत्यता शोधण्यासाठी चौकशी केली जात आहे.’
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीएलओवरही आरोप
तेजस्वी यादव यांनी असाही आरोप केला की, त्यांच्या घरी आलेल्या बूथ लेव्हल ऑफिसरने कोणतीही पावती दिली नाही आणि फक्त एक फॉर्म भरून निघून गेला. यावर आयोगाने म्हटले आहे की, तक्रार असल्यास, त्यांनी नियमांनुसार दावा किंवा आक्षेप दाखल करायला हवा होता.
आयोगाचा आक्रमक पवित्रा
बिहारचे राजकारण तापल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितले की १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत एक विशेष पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. आरजेडीच्या ४७,५०६ बूथ एजंटना मसुदा यादी देण्यात आली आहे, परंतु आतापर्यंत कोणीही कोणताही आक्षेप किंवा दावा केलेला नाही. आयोगाने प्रश्न उपस्थित केला की जेव्हा एजंट गप्प आहेत, तेव्हा तेजस्वी यादव हा मुद्दा पुन्हा पुन्हा का उपस्थित करत आहेत?