Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EVM Manipulation: ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई; निवडणूक आयोगाचे कडक नियम लागू

आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, EVM च्या बटणांशी कोणतीही छेडछाड सहन केली जाणार नाही. यापूर्वी काही ठिकाणी विशिष्ट उमेदवाराच्या बटणावर गोंद, टेप किंवा इतर पदार्थ लावल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 22, 2026 | 03:55 PM
Election Commission, EVM, EVM Protection,ECI, Election Rules,

Election Commission, EVM, EVM Protection,ECI, Election Rules,

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे कडक नियम
  • बटणाशी छेडछाड केल्यास थेट फौजदारी गुन्हा
  • छेडछाड झाल्याचे सिद्ध झाल्यास त्या केंद्रावरील मतदान रद्द करुन पुर्नमतदान घेणार
Election Commission New EVM Rules: पश्चिम बंगाल, तामिलनाडू या राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंतच्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. लोकशाहीच्या महत्त्वाच्या पर्वात मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोग यावेळी अधिक सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

आयोगाचा मुख्य उद्देश प्रत्येक मतदाराचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे आणि प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ न देणे हा आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) संदर्भात काही महत्त्वाचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

West Bengal Election 2026 रक्ताचा सडा अन् किंकाळ्या! दांतनमध्ये भाजपच्या रॅलीवर शस्त्रसज्ज हल्ला; भाजप उमेदवार जखमी

EVM बटणाशी छेडछाड केल्यास गुन्हा

आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, EVM च्या बटणांशी कोणतीही छेडछाड सहन केली जाणार नाही. यापूर्वी काही ठिकाणी विशिष्ट उमेदवाराच्या बटणावर गोंद, टेप किंवा इतर पदार्थ लावल्याच्या तक्रारी आल्या होत्या. आता जर कोणत्याही बटणावर शाई, इत्र किंवा इतर रासायनिक पदार्थ आढळल्यास तो थेट निवडणूक गुन्हा मानला जाईल. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे मतदानाची गोपनीयता भंग होते तसेच मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

गडबड आढळल्यास पुनर्मतदानाची शक्यता

मतदानाची पारदर्शकता राखण्यासाठी आयोगाने पुनर्मतदानाचा पर्यायही खुला ठेवला आहे. पीठासीन अधिकाऱ्यांना EVM वर सतत लक्ष ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर एखाद्या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाले, तर त्या केंद्रावरील मतदान रद्द करून पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Kedarnath Dham : ‘हर हर महादेव’च्या गजरात उघडले केदारनाथ धामचे द्वार; मोबाईल वापर अन् रिल्सवर बंदी

बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी काही राज्यांमध्ये कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, मतदान सुरू होण्याच्या ४८ तास आधी संबंधित मतदारसंघाबाहेरील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या भागातून बाहेर पडणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे मतदानाच्या दिवशी बाहेरील दबाव किंवा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता कमी होणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदारांसाठी विशेष सुविधा

सुरक्षेबरोबरच मतदारांना सोयीस्कर वातावरण मिळावे यासाठीही आयोगाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सावलीची व्यवस्था आणि प्रकाशाची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, बसण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र सुविधा उपलब्ध असतील. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर ‘वोटर असिस्टन्स बूथ’ उभारण्यात आले असून, मतदारांना त्यांचा क्रमांक आणि केंद्राची माहिती सहज मिळू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली असून, बाहेर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

Web Title: Election commission issues new directives strict punishment for evm manipulation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Election Commission
  • EVM
  • west bengal election

संबंधित बातम्या

PM Modi Jhalmuri : पश्चिम बंगालमध्ये झालमुरीचे राजकारण! PM मोदींनी स्वाद घेताच विरोधकांना लागली मिरची
1

PM Modi Jhalmuri : पश्चिम बंगालमध्ये झालमुरीचे राजकारण! PM मोदींनी स्वाद घेताच विरोधकांना लागली मिरची

Maharashtra Legislative Council Election 2026 : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल…! विधानपरिषदचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
2

Maharashtra Legislative Council Election 2026 : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल…! विधानपरिषदचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.