Money (7)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता जाहीर झाल्यापासून अनेकांनी आचारसंहीतेचा भंग केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचरसंहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत.

    देशात आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्प्यातील मतदान पार पडत आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान (Voting) सुरू झालं आहे. या निवडणुकीच्या धुमाळीत एक मोठी बातमी समोर येत आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी उमेदवार वेगवेगळी प्रलोभन देतात. अशाच उमेदवारांवार राज्य उत्पादन शुल्क विभागानं नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचरसंहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत. तर आत्तापर्यंत 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    आत्तापर्यंत 3 हजार 754 आरोपींना अटक

    लोकांमध्ये निष्पक्ष मतदान करावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतात. मात्र, काही ठिकाणी उमदेवारांकडून मतदारांना विविध प्रकारची प्रलोभनं देण्यात येण्याचे प्रकार नेहमीचं उघडकीस येतात.  अशावेळी पार्ट्यांचं देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं. त्यावर अंकुश ठेवण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठं यश आलं आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता जाहीर झाल्यापासून अनेकांनी आचारसंहीतेचा भंग केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचरसंहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत. तर या गुन्ह्यात 3 हजार 754 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर या सर्व कारवाई दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केला आहे.

    देशातील 102 मतदारसंघात सुरू आहे मतदान

    देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होणार आहे. देशातील एकूण 102 मतदारसंघात आज मतदार आपला मतदानाचा हक्ब बजावणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातीलही काही मतारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात आज मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळं आज मतदार कोणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार हे 4 जूनला समजणार आहे.