Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केदारनाथमध्ये भीषण अपघात; अपघातग्रस्त हेलिकॉप्टर वाहून नेताना नदीत कोसळले

उत्तराखंडमधील केदारनामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एक हेलिकॉप्टर अचानक नदीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक खराब हैलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना अचानक गिरक्या घेत खाली पडले.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 31, 2024 | 03:29 PM
केदारनाथमध्ये अपघातग्रस्त विमान दुरूस्तीसाठी घेऊन जाताना नदीत कोसळले

केदारनाथमध्ये अपघातग्रस्त विमान दुरूस्तीसाठी घेऊन जाताना नदीत कोसळले

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: उत्तराखंडमधील केदारनामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एक हेलिकॉप्टर घेऊन जाताना अचानक नदीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक खराब हैलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना अचानक गिरक्या घेत खाली पडले. भारतीय वायुसेनेचे एम आय 17 हेलिकॉप्टर एक खराब झालेले हेलिकॉप्टर घेऊन जात होते. त्यादरम्यान MI 17 हेलिकॉप्टरचा तोल जाऊन हे हेलिकॉप्टर काली पडले. मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वीच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली होती. तेच हेलिकॉप्टर शनिवारी सकाळी क्रॅश झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर लोलक सारखे थरथरू लागले

वायुसेनेच्या म्हणण्यानुसार, पायलटच्या लक्षात आले की हेलिकॉप्टर पडू शकते आणि एमआय 17 चे नुकसान होऊ शकते, त्यामुळे पायलटने ते सुरक्षित ठिकाणी टाकले. जिल्हा पर्यटन अधिकारी राहुल चौबे यांनी सांगितले की, 24 मे 2024 रोजी क्रिस्टल एव्हिएशन कंपनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाच्या सावधगिरीमुळे हेलीचे केदारनाथ हेलिपॅडच्या काही अंतरावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलीतील सर्व प्रवाशांचे सुरक्षित लँडिंग झाले.

The KESTRAL Aircraft which was being taken underslung from #KedarNath to #Gauchar has been released midway on the river near Bhimballi#helicopter #India #BreakingNews #safefly #chardham pic.twitter.com/zDooyF7dY0 — Safe Fly Aviation (@AirCharterIndia) August 31, 2024


शनिवारी दुरूस्तीसाठी हेली गौचर हवाईपट्टीवर नेण्यात येत होते. त्यानुसार क्रिस्टल एव्हिएशनची हेली हवाई दलाच्या एमआय 17 हेलिकॉप्टरमधून टांगून गौचर येथे घेऊन चालले होते. असे पर्यटन अधिकाऱ्याने सांगितले. सकाळी थोड्या अंतरावर येताच हेलिकॉप्टरचे वजन आणि वाऱ्याच्या प्रभावामुळे MI 17 ने आपला तोल सोडण्यास सुरुवात केली, त्यामुळे थारू कॅम्पजवळ आल्यानंतर हेलिकॉप्टरला MI 17 वरून खाली सोडावे लागले. हेलीमध्ये कोणतेही प्रवासी किंवा उपकरणे नव्हती. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. टीम परिस्थितीचा अंदाज घेत आहे. हेली अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची अफवा पसरवू नका, असे आवाहन त्यांनी सर्व लोकांना केले आहे.

हे देखील वाचा – आता दिल्ली पोलिसांकडूनच मिळणार पैसे; 50 हजार बक्षिस मिळवण्याची संधी

Web Title: Fatal accident in kedarnath the stricken helicopter fell into the river while being transported nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 03:26 PM

Topics:  

  • Kedarnath
  • Kedarnath News

संबंधित बातम्या

Kedarnath disaster 2013 : आता 3075 लोकांच्या मृत्यूचा लागणार छडा? 12 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार मानवी सांगाड्यांचा शोध
1

Kedarnath disaster 2013 : आता 3075 लोकांच्या मृत्यूचा लागणार छडा? 12 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार मानवी सांगाड्यांचा शोध

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत निसर्गाचा ब्रेक; हायवे बंद अन्…; पहा Video
2

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत निसर्गाचा ब्रेक; हायवे बंद अन्…; पहा Video

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका
3

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका

केदारनाथवरून आल्यावर लावावं लागलं सलाइन, अमृता खानविलकरची बिघडली तब्येत!
4

केदारनाथवरून आल्यावर लावावं लागलं सलाइन, अमृता खानविलकरची बिघडली तब्येत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.