फोटो सौजन्य: iStock
नवी दिल्ली: अनेकदा असे घडते की, ट्रॅफिक पोलीसांनी आपल्याला नियम तोडताना पकडलेले असते. त्याचवेळी दुसरा कोणीतरू पटकन तिथून निघून जातो. तुम्ही ट्रॅफिक हवलदाराला सांगितले की, कार नो-पार्किंगमध्ये उभी आहे, पण तुम्ही त्याची पावती देत नाही तरी ते ऐकत नाहीत. अशा वेळी खूप राग येतो. पण आतापासून जर कोणी नियम तोडला आणि तुम्ही त्याचे फोटो, व्हिडीओ ॲपवर अपलोड केले तर दर महिन्याला ५० हजार रुपये मिळतील. विशेष म्हणजे हे पैसे वाहतूक विभागाकडूनच तुम्हाला मिळणार आहेत. ५० हजारांबरोबरच २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयेही आहेत. तुम्हाला फक्त ‘ट्रॅफिक हिटर’ व्हायचे आहे. दिल्ली वाहतूक पोलीस आपले ट्रॅफिक सेंटिनेल ॲप पुन्हा लॉन्च करणार आहे.
ट्रॅफिक सेंटिनल योजना (TSS)
वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी दिल्ली परिवहन विभागाने एक उत्तम योजना आणली आहे. ही योजना पूर्वीपासून होती, मात्र आता ती पुन्हा सुरू केली जात आहे. यापूर्वी हा पुरस्कार वर्षातून एकदा दिला जात होता, मात्र आता दर महिन्याला तुम्हाला याचे बक्षिस मिळणार आहे. ट्रॅफिक सेंटीनल स्कीम (TSS) चा उद्देश सामान्य लोकांना वाहतूक पोलिसांचे डोळे आणि कान बनवणे आहे. यासाठी दिल्ली ट्रॅफिक पोलीस आपले ॲप पुन्हा लॉन्च करणार आहे.
ट्रॅफिक सेंटिनेल ॲप 1 सप्टेंबरपासून Google Play आणि iOS वर तुम्हाला मिळेल. यानंतर, जर तुम्हाला कोणी ट्रॅफिक लाइट तोडताना किंवा वेगात गाडी चालवताना दिसला तर तुम्हाला फक्त त्याचा फोटो किंवा व्हिडिओ ॲपवर पोस्ट करायचा आहे. जर कोणी आपली कार नो-पार्किंग झोनमध्ये पार्क करत असेल किंवा रस्त्यावर पायलटिंग करत असेल, म्हणजे बेपर्वाईने गाडी चालवत असेल, तर त्याचीही ॲपवर तक्रार तुम्ही करू शकता. फोटो किंवा व्हिडिओसोबत तुम्हाला तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहितीही शेअर करावी लागेल.
बक्षिस मिळवण्यासाठी ॲपवर रजिस्ट्रेशन करा
ॲपवर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागेल. ट्रॅफिक पोलिस तुमचा फोटो किंवा व्हिडिओ तपासतील आणि पुढील कारवाई करतील. हे सर्व करण्यासाठी, तुम्हाला जास्तीत जास्त 50 हजार रुपये आणि किमान 10 हजार रुपये बक्षीस म्हणून मिळू शकतात. प्रत्येक महिन्याची माहिती पुढील महिन्यात घेतली जाईल.
बक्षीस कोणाला मिळणार हे दिल्ली वाहतूक पोलिस ठरवतील. जसे की कोणी सर्वात जास्त मीहिती दिला, किती बरोबर आहेत या गोष्टींवरून तुम्हाला बक्षिस मिळेल. त्यामुळे आता तुमच्या फोनचा कॅमेरा नीट वापरा. तसेच तुम्ही देखील ट्रॅफिकचे नियम पाळत राहा नाहीतर कोणीतरी तुमचाही फोटो अपलोड करेल.