नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीमधील द्वारका सेक्टरमधील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ७ व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. पाहता पाहता आग सगळीकडे पसरली. ज्या मजल्यावर आग लागली होती त्या ठिकाणी एक कुटुंब अडकले होते.
दिल्लीत द्वारका सेक्टरमध्ये असणाऱ्या एक इमारतीमध्ये ७ व्या मजल्यावर आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. त्यात ७ व्या मजल्यावर एक एक कुटुंब आडकले होते. जीव वाचवण्यासाठी त्या कुटुंबाने ७ व्या मजल्यावर खाली उडी मारली. यामध्ये वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही घटना आज सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, द्वारका सेक्टर १३ मधील एका इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्या. आगीची भीषणता इतकी हायनक होती की, काहीच क्षणात संपूर्ण इमारतीला आगीचा विळखा पडला.
#WATCH दिल्ली: द्वारका सेक्टर 13 स्थित सबद अपार्टमेंट की सातवीं मंजिल पर स्थित एक फ्लैट में आग लग गई। मौके पर दमकल की 8 गाड़ियां पहुंच गई हैं। दो से तीन लोगों के फंसे होने की आशंका है। आग बुझाने का काम जारी है। किसी के हताहत होने की कोई सूचना नहीं है: दिल्ली फायर सर्विसेज pic.twitter.com/jarj7qArNJ
— ANI_HindiNews (@AHindinews) June 10, 2025
७ व्या मजल्यावर आगीची भीषणता इतकी होती की तिथे अडकलेल्या कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी थेट ७ व्या मजल्यावरून उडी मारली. वडिलांनी आपल्या दोन मुलांसह खाली उडी मारली. मात्र या घटनेत दोन लहान मुले आणि वाडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लाकडी वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी
शहरातील मध्यवर्ती भागामध्ये काल (दि.06) आगीची भीषण घटना घडली. शहरातील नाना पेठेमध्ये राम मंदिराशेजारील वाड्याला आग लागल्याची घटना घडली. जुन्या पद्धतीचा वाडा असल्यामुळे आगीचा भडका उडाला होता. लाकडी वाडा असल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. रामनवमी असल्यामुळे मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी होती. पुण्यातील अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
Pune Fire News : लाकडी वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी! पुण्यातील नाना पेठेत घटना
नाना पेठेतील राम मंदिराजवळ ही आग लागली. पारेख वाडा असे या आग लागलेल्या वाड्याचे नाव होते. वाड्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने फायरगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी तीन मजली लाकडी जुन्या वाड्याला आग भीषण आल्याचे पाहताच अतिरिक्त मदत मागवण्यात आली. संपूर्ण धगधगता वाडा पाहण्यासाठी बघ्याची देखील मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाकडून एकुण 10 फायरगाड्या 4 वॉटर टँकर 2 देवदूत वाहने तसेच व्हेईकल डेपोकडून पाच वॉटर टँकर रवाना करण्यात आले.