मोठी बातमी! भर समुद्रात विशाल जहाजावर भीषण आगीचे तांडव; ४ जण बेपत्ता; पहा VIDEO
केरळ: केरळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अरबी समुद्रात कोलंबोमधून न्हावा-शिवाकडे येणाऱ्या महाकाय जहाजाला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. परदेशी मालवाहू जहाजाला आग लागली असून याचा व्हिडीओ समोर आला आहे. जहाजाला भीषण आग लालगल्याची माहिती मिळताच तटरक्षक दलाने बचावकार्य सुरु केले आहे.
कोलंबो येथून न्हावा शिवाकडे येणाऱ्या महाकाय मालवाहू जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे. केरळच्या जवळच अरबी समुद्रात हि घटना घडली आहे. जहाजावर २२ कर्मचारी होते. त्यातील १८ कर्मचाऱ्यांनी समुद्रात उडी घेतली. मात्र ४ कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत. जहाजामध्ये अनेक स्फोट झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. २० पेक्षा जास्त कंटेनर समुद्रात कोसळल्याची देखील माहिती समोर येत आहे.
केरल: अरब सागर में मालवाहक जहाज में लगी भीषण आग!
सुनी गई धमाकों की आवाज!
चालक दल के 18 सदस्यों को बचाया गया!
4 अब भी लापता, पांच हुए घायल
📷#Kerala #ShipExplosion #BreakingNews pic.twitter.com/1De2iBqYAJ
— अभिषेक 'अजनबी' ✍🏻 (@abhishekAZNABI) June 9, 2025
भीषण आगीच्या विळख्यात सापडलेले हे जहाज अजून बुडालेले नाही. मात्र जहाजावरील स्थिती गंभीर असल्याचे समजते आहे. हि घटना कोझिकोडपासून ४० मील आत समुद्रात घडली. या जहाजावर सिंगापूरचा झेंडा असल्याचे समजते आहे. आग लागल्याने अनेक कंटेनर समुद्रात कोसळले. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले
दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून गाडीतून 8 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची माहिती असून यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळत आहे. ही घटना आज (9 जून) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
जखमी प्रवाशांना तातडीने कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेत प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी दारातच उभे होते. त्यातच दिवा ते कोपर या स्थानकादरम्यान काही प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. जखमी आणि मृत प्रवशांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे, तसेच, हे प्रवासी ३० -३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे.
Mumbra Train Accident : दिवा- मुंब्रा लोकल दुर्घटनेत पोलिस कर्मचाऱ्याचाही मृत्यू, सहा जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
रेल्वे अपघातावर राज ठाकरेंचे भाष्य
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवर बोलताना माणसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “रेल्वेची घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र मुंबईच्या रेल्वेमध्ये असे अपघात सातत्याने घडत आहेत. हा विषय केवळ रेल्वेपुरता मर्यादित नाही. आपल्या शहरांचा विचका झाला आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची आपल्याकडे गोष्टच नाहीये. रेल्वे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. कोण येतंय, कोण जातंय हे कळात नाहीये. रस्ते नसल्याने पार्किंग नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.”