Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; राम मंदिर सोहळ्याचा दिमाखदार सोहळ्याला राहणार उपस्थित

  • By युवराज भगत
Updated On: Jan 19, 2024 | 04:12 PM
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; राम मंदिर सोहळ्याचा दिमाखदार सोहळ्याला राहणार उपस्थित
Follow Us
Close
Follow Us:

Ram Mandir Ceremony : अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २२ जानेवारीच्या दिवशी हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातल्या व्यक्तींना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. या सोहळ्याला काँग्रेसने येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच शरद पवार यांनीही आपण या सोहळ्याला जाणार नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे जे पाच न्यायाधीश होते, त्या सगळ्यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण धाडण्यात आले आहे.

या पाच न्यायाधीशांना निमंत्रण

राम मंदिर आणि बाबरी मशीद वादाची सुनावणी करणारे पाच न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद बोबडे, डीवाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर अशा पाचही न्यायाधीशांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या पाच जणांनी रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला होता. ज्यानंतर मंदिर निर्मिताचा मार्ग मोकळा झाला. आता हे पाचही न्यायाधीश प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला स्वतंत्र पाच एकर जमीन

राम मंदिर-बाबरी मशीद वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, २.७७ एकरची वादग्रस्त जमीन रामलल्लाचे जन्मस्थान आहे. न्यायालयाने ही जमीन भारत सरकारने नंतर स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाने सरकारला उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला स्वतंत्र पाच एकर जमीन देण्यास सांगितले होते जेणेकरून बोर्ड मशीद बांधू शकेल. ६ डिसेंबर १९९२ रोजी एका जमावाने बाबरी मशीद पाडली. यानंतर राम मंदिर आंदोलनाने वेगळे वळण घेतलं होतं.

२२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी काही राज्यांमध्ये सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी देशातील चित्रपट आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

देशाच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस

२२ जानेवारीला बालरुपातील रामाच्या मूर्तीची आणि शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या शाळिग्राम मूर्तीचा प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात येणार आहे. हा देशाच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस असणार आहे यात काहीही शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचं भूमीपूजन केलं होतं. आता याच मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच अयोध्या नगरी रामाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

Web Title: Five judges of supreme court who gave ram mandir verdict were also invited to pranapratistha ceremony nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2024 | 04:12 PM

Topics:  

  • Ram Mandir Ceremony
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Amit Shah in Rishikesh : गझनवी, खिलजी गप्प झाले पण आजही सनातनी ध्वज…; अमित शाहांचा आक्रमक पवित्रा
1

Amit Shah in Rishikesh : गझनवी, खिलजी गप्प झाले पण आजही सनातनी ध्वज…; अमित शाहांचा आक्रमक पवित्रा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी
2

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

Shivsena-NCP Dispute final hearing: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
3

Shivsena-NCP Dispute final hearing: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

Reservation Issue : नगर परिषदांमधील नगरसेवकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
4

Reservation Issue : नगर परिषदांमधील नगरसेवकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.