Vice President Election : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार चुरशीची; राज्यात महाविकास आघाडीचे पारडे जड
Jagdeep Dhankhar Resignation : नवी दिल्ली : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला. धनखड यांनी आरोग्याचे कारण पुढे करत हा अचानकपणे दिलेल्या राजीनाम्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला देखील आहे. सध्या उपराष्ट्रपती पद रिक्त असून पुढील सहा महिन्यामध्ये नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती केली जाईल. मात्र त्यापूर्वी आता जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यापूर्वीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 22 जुलै रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. मीडिया रिपोर्टनुसार, त्यापूर्वी केंद्र सरकार आणि जगदीप धनखड यांच्यामध्ये काही घडामोडी झाल्या आहेत. गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती सचिवालयाकडून गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना (पोलीस आधुनिकीकरण विभाग) त्यांच्या अधिकृत वाहनांच्या स्थितीबद्दल एक पत्र पाठवण्यात आले. यापूर्वी देखील गाडीसाठी पोलीस विभागासोबत पत्र व्यवहार करण्यात आला होता. मात्र त्यावेळी गाडी खरेदी ही गृह विभागाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपराष्ट्रपती सचिवालयातील तत्कालीन उपसचिवांनी त्यांच्या पत्रव्यवहारात लिहिले होते की, “मला तुम्हाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत की, भारताचे माननीय उपराष्ट्रपती त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान वापरण्यासाठी तीन बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू हाय-सिक्युरिटी वाहने वापरतात, तीन वाहनांपैकी दोन वाहने सहा वर्षपेक्षा जास्त जुनी झाली आहेत, तर तिसरे वाहन जवळजवळ चार वर्षे आणि पाच महिने जुने आहे, जे पुढील काही महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त जुने होईल. या तिन्ही वाहनांची ऐवजी नवीन तीन बुलेटप्रुफ आणि हाय सिक्युरिटी असणाऱ्या वाहने देण्यात यावी. ही तीन वाहने बदलण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी” असे उपराष्ट्रपती सचिवालयाकडून निर्देश देण्यात आले होते.
गृह मंत्रालयाच्या सचिवांकडून उत्तर
मात्र यावर गृह मंत्रालयाकडून समिती स्थापन करण्यात येईल असे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, 28 फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती सचिवालयाच्या या पत्राला 12 जून रोजी 2024 गृह विभागाच्या सचिवांकडून रोजी उत्तर देण्यात आले. यामध्ये लिहिण्यात आले की, “ते उपराष्ट्रपतींच्या तिन्ही वाहनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक मंडळ तयार करत येत आहे. यामध्ये सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ज्यात एनएसजीचे दोन आणि सीआरपीएफचा एक अधिकारी यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी बुलेटप्रूफ वाहनांशी संबंधित तांत्रिक बाबींमध्ये जाणकार आहेत.” असे गृह विभागाच्या सचिवांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशाचे उपराष्ट्रपती पद हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपराष्ट्रपतींना दिल्ली पोलिसांचे ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान केली जाते. दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या अंतर्गत पत्रकात म्हटले होते की, उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाने धनखड यांच्या बुलेटप्रूफ वाहनांची पाच वर्षांची मुदत संपल्यामुळे वाहने बदलली आहेत. नवीन वाहन इनोव्हा आहे, तर अतिरिक्त वाहन फॉर्च्यूनर आहे, आणि दोन्हीही वाहने बुलेटप्रूफ नाहीत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच उपराष्ट्रपतींचे ओएसडी आणि सचिव यांना सांगण्यात आले होते की ही वाहने बुलेटप्रूफ नाहीत, आणि गरज पडल्यास अशी वाहने दिल्ली पोलिसांकडून मागवता येतील, परंतु ती नाकारण्यात आली.