Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale: ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश’, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर आठवलेंचा जोरदार आक्षेप; म्हणाले…

विश्व हिंदू परिषदेने गरबा कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याची मागणी केली आहे. या भूमिकेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, त्यामुळे हिंसा भडकू शकते असा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 21, 2025 | 06:10 PM
Ramdas Athawale (Photo Credit- X)

Ramdas Athawale (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश’
  • विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर आठवलेंचा जोरदार आक्षेप
  • ‘यामुळे हिंसा भडकू शकते’; आठवलेंचा इशारा

Ramdas Athawale On VHP: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. नवरात्रीमध्ये होणाऱ्या ‘गरबा’ कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याच्या VHP च्या भूमिकेचा त्यांनी कडाडून विरोध केला असून, असे आवाहन ‘हिंसेला निमंत्रण’ देण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.

‘फक्त हिंदूंनाच प्रवेश’ – VHP ची भूमिका

विश्व हिंदू परिषदेने (VHP) शनिवारी म्हटले होते की, ‘गरबा’ कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जावा. ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना टाळण्यासाठी प्रवेश करणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड तपासणी करण्याचा सल्लाही आयोजकांना देण्यात आला होता. गरबा हा पूजेचाच एक भाग असून तो केवळ नृत्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नाही, असेही VHP ने म्हटले होते.

‘यामुळे हिंसा भडकू शकते’; आठवलेंचा इशारा

VHP च्या या भूमिकेवर रामदास आठवले यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘मी याचा तीव्र निषेध करतो! गरबा कार्यक्रमात कोण जाईल आणि कोण नाही, हे ठरवणारे विश्व हिंदू परिषद कोण?’

मैं कड़ी निंदा करता हूँ! विश्व हिंदू परिषद कौन होती है तय करने वाली कि गरबा में कौन जाएगा और कौन नहीं?#SayNoToDiscrimination #Navratri2025 #VHPControversy #GarbaForAll — Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 21, 2025

Mahayuti: “भाजपकडून जागा न मिळाल्यास…”; आगामी निवडणुकीवरून आठवलेंचा महायुतीला इशारा

आठवले पुढे म्हणाले, “हा सल्ला फक्त आयोजकांना सूचना देण्यापुरता मर्यादित नाही, तर काही कट्टरपंथीयांना हिंसा भडकवण्याचे आणि बळाचा वापर करण्याचे खुले निमंत्रण आहे.” केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी सांगितले की, “जर या सल्ल्यामुळे नवरात्रीदरम्यान देशात कुठेही संघर्ष, हल्ला किंवा धार्मिक वाद झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी VHP आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची असेल.”

सरकार और प्रशासन को तुरंत कार्रवाई करते हुए यह सुनिश्चित करना चाहिए कि गरबा और डांडिया आयोजकों को पूरी सुरक्षा मिले। किसी भी प्रकार की जबरदस्ती, पहचान की चेकिंग या धार्मिक भेदभाव की कोशिशों को कानून के तहत सख़्ती से रोका जाए। नवरात्रि सबकी है – इसमें किसी की आस्था का अपमान नहीं,… — Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 21, 2025


गरबा हा पूजा आणि आनंदाचा सण आहे, तो द्वेष आणि संशयाचे व्यासपीठ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही आठवले यांनी म्हटले. अशा प्रकारच्या कृती भारताची एकता, विविधता आणि धार्मिक सहिष्णुतेवर हल्ला करतात, असेही आठवले म्हणाले.

Web Title: Garba hindu entry vhp ramdas athawale objection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • Nation News
  • Navratri
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Gujarat: वापीमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड! ATSच्या छाप्यात ३० कोटींचे MD ड्रग्ज जप्त तर ३०० किलो….
2

Gujarat: वापीमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड! ATSच्या छाप्यात ३० कोटींचे MD ड्रग्ज जप्त तर ३०० किलो….

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले
3

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका
4

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.