भोपाळ : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील लसूण उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत खूश आहेत. कारण घाऊक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातून 300 रुपये किलो दराने लसूण खरेदी करत आहेत. हा लसूण बाजारात 400 रुपये किलोने विकला जात आहे. यावेळी शेतकऱ्यांना लसणापासून कोट्यवधी रुपयांचा फायदा होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून लसूण पिकावर लक्ष ठेवले आहे.
मजूर सीसीटीव्हीच्या माध्यमातून काम करताना दिसतात. लसूण महाग आहे. चोरीची भीती आहे. त्यामुळे कॅमेरे लावण्यात आले आहेत. आजकाल सोलर सीसीटीव्ही कॅमेरे आले आहेत. त्यासाठी वीजही लागत नाही, असे तरूण शेतकरी राहुल देशमुख याने सांगितले.
आपल्या मेहनतीतून आणि झोकून देऊन त्यांनी शेतीतून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला आहे. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या शेतात लसणाची लागवड केली असून, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
एकाच ठिकाणी पिक घेणे अशक्य
लसणाची लागवड वर्षाच्या त्यावेळी केली जाते. जेव्हा लसूण महाग असतो. जूनमध्ये भाव चढे असतानाच आम्ही लसणाची लागवड करतो. जमिनीलाही विश्रांतीची गरज आहे. लसूण एकाच ठिकाणी पुन्हा-पुन्हा लावला जात नाही. आगामी वर्षातही लसूण महागणार आहे.
कोट्यवधींचा कमावला नफा
जिल्ह्यातील सांवरी येथील पोनार गावातील १३ एकरात लागवड राहुलने सांगितले की, त्यांच्याकडे एकूण 35 एकर शेती आहे. टोमॅटोचे पीक 16 एकरात, सिमला मिरची 2 एकरात आणि लसूण पीक 13 एकरात घेतले जाते. मुख्य पीक लसूण आहे.
खर्च २५ लाख, नफा १ कोटींचा
शेतकरी राहुल देशमुख यांनी सांगितले की, मी 13 एकरात लसूण पिकाची लागवड केली होती. नफा 1 कोटी रुपयांच्या वर आहे आणि खर्च 25 लाख रुपये आहे.