Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Supply News: देशात गॅस पुरवठा सुरळीत! रशिया-ऑस्ट्रेलियातून आयातीचा वेग वाढला; पेट्रोलियम मंत्रालयाचे नागरिकांना मोठे आवाहन

देशात एलपीजी आणि सीएनजी पुरवठा सुरळीत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच आखाती देशांत अडकलेल्या २.८ लाख भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 08:17 PM
देशात गॅस पुरवठा सुरळीत! रशिया-ऑस्ट्रेलियातून आयातीचा वेग वाढला (Photo Credit- X)

देशात गॅस पुरवठा सुरळीत! रशिया-ऑस्ट्रेलियातून आयातीचा वेग वाढला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • देशात गॅस पुरवठा सुरळीत!
  • रशिया-ऑस्ट्रेलियातून आयातीचा वेग वाढला
  • पेट्रोलियम मंत्रालयाचे नागरिकांना मोठे आवाहन
नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅसबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी देशातील इंधन स्थिती सामान्य असून कच्च्या तेलाचा पुरवठा आणि रिफायनरीचे काम नियमित सुरू असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन संपल्याची अधिकृत नोंद नसून सर्व आउटलेट्स पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

कमर्शियल ग्राहकांना ‘सीएनजी’कडे वळण्याचे आवाहन

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती पीएनजी (PNG) आणि वाहतुकीसाठी लागणाऱ्या सीएनजीचा (CNG) पुरवठा १००% खात्रीशीर असून त्यात कोणतीही कपात केलेली नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना शक्य तिथे सीएनजीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी अनेक कंपन्यांनी विशेष सवलती (Incentives) जाहीर केल्या आहेत. जे राज्य पीएनजी नेटवर्कच्या विस्तारासाठी मदत करतील, त्यांना १०% अतिरिक्त कमर्शियल एलपीजी देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. गेल्या दोन आठवड्यांत सव्वा लाख नवीन गॅस कनेक्शन्स देण्यात आली आहेत.

युद्धाच्या सावटाखालीही ऑनलाइन बुकिंगमध्ये वाढ

जागतिक युद्धाच्या परिस्थितीमुळे एलपीजीच्या जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असला, तरी भारतात वितरणाबाबत कोणतीही कमतरता नाही. सध्या एलपीजीचे ऑनलाइन बुकिंग ९४% पर्यंत पोहोचले असून ८३% पेक्षा जास्त डिलिव्हरी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC) द्वारे केली जात आहे. “घाबरून जाऊन (Panic Booking) जास्तीचे सिलेंडर बुक करण्याचे प्रमाण कमी झाले असून काल एका दिवसात ५७,००० रिफिल बुकिंग झाले आहेत,” असे सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले. तसेच १७ राज्यांनी व्यावसायिक एलपीजीसाठी वाटप आदेश जारी केले आहेत.

India Oil Strategy : इंधन दर वाढीच्या संकटात भारताला दिलासा; रशियाकडून तेल खरेदी वाढली

आखाती देशांतून भारतीयांची सुखरूप घरवापसी

दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव असीम महाजन यांनी आखाती देशांतील भारतीयांच्या प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. काही देशांमध्ये तांत्रिक निर्बंध असले तरी विमान वाहतूक वेगाने सुधारत आहे. २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुमारे २,८०,००० भारतीय मायदेशी परतले आहेत.

  • युएई (UAE): भारत आणि युएई दरम्यान मर्यादित विमाने सुरू असून आज ९० उड्डाणे होण्याची शक्यता आहे.
  • कतार व ओमान: ओमान आणि सौदी अरेबियातून उड्डाणे नियमित सुरू आहेत. कतार एअरवेज आज भारतासाठी ९ विशेष विमाने चालवत आहे.
  • कुवैत व बहरीन: कुवैत आणि बहरीनची हवाई हद्द अद्याप बंद आहे. मात्र, जजीरा एअरवेज आणि गल्फ एअर सौदी अरेबियाच्या विमानतळांवरून भारतीयांसाठी विशेष उड्डाणे आयोजित करत आहेत.

‘सेफसी विष्णू’ जहाजातील खलाशी परतणार

इराकच्या समुद्रकिनारी अपघातग्रस्त झालेल्या ‘एमटी सेफसी विष्णू’ (MT SAFESEA VISHNU) जहाजातील १५ भारतीय क्रू सदस्यांची सुटका करण्यात आली आहे. हे सर्व खलाशी इराक सोडून भारताकडे येण्यासाठी निघाले आहेत. या दुर्घटनेत दुर्दैवाने प्राण गमावलेल्या एका भारतीय नागरिकाचा पार्थिव देह परत आणण्यासाठी इराक प्रशासनाशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

Pinaka ER: पोखरणमध्ये पिनाकाची गर्जना! नागपूरच्या ‘सोलर ग्रुप’ने बनवला शत्रूसाठी विनाशाचा वज्रप्रहार; 45 किमीवरून होणार खात्मा

Web Title: Gas supply in the country runs smoothly pace of imports from russia and australia accelerates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Central Governement
  • LPG Gas

संबंधित बातम्या

UPSC मुख्य परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू! ‘हा’ फॉर्म न भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही? जाणून घ्या नियम
1

UPSC मुख्य परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू! ‘हा’ फॉर्म न भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.