Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cancer Medicines Price Cut : कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत 96 टक्क्यांपर्यंत कपात! रुग्णांचे वर्षाला 3,540 कोटी रुपये वाचणार

Cancer Medicines Price Cut : केंद्र सरकारने कॅन्सरवरील 1,364 औषधांच्या सुधारित किमती लागू केल्या. औषधांच्या किमतीत 96.45 टक्क्यांपर्यंत कपात झाल्याने रुग्णांना वर्षाला 3,540 कोटींची बचत अपेक्षित आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 09, 2026 | 09:39 PM
Cancer Medicines Price Cut : कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत 96 टक्क्यांपर्यंत कपात! रुग्णांचे वर्षाला 3,540 कोटी रुपये वाचणार

Cancer Medicines Price Cut : कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत 96 टक्क्यांपर्यंत कपात! रुग्णांचे वर्षाला 3,540 कोटी रुपये वाचणार

Follow Us
Follow Us:
  • 1,364 औषधांच्या सुधारित किमती लागू
  • 679 ब्रँडच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक घटल्या
  • अशी करा औषधांच्या किमतींची पडताळणी
 

कॅन्सरच्या उपचारासाठी औषधांवर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॅन्सरवरील औषधांच्या 1,364 फॉर्म्युलेशन्सच्या सुधारित किरकोळ किमती लागू (Cancer Medicines Price Cut)  करण्यात आल्या आहेत. तसेच, 137 कॅन्सरविरोधी औषधांच्या ट्रेड मार्जिनवर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रुग्णांना दरवर्षी सुमारे 3,540.38 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय औषध मूल्यनिर्धारण प्राधिकरणाने (NPPA) 137 कॅन्सरविरोधी औषधांच्या कमाल किरकोळ किमतीवरील ट्रेड मार्जिनची मर्यादा निश्चित केली आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) 17 ऑक्टोबर 2026 रोजी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.

679 ब्रँडच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक घटल्या

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबरपर्यंत 85 औषध कंपन्यांनी 121 औषधांशी संबंधित 1,364 कॅन्सरविरोधी फॉर्म्युलेशन्सच्या सुधारित कमाल किरकोळ किमतींची माहिती सादर केली होती. यापैकी 679 ब्रँडच्या किमतींमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक कपात झाली आहे. तर काही औषधांच्या कमाल किरकोळ किमतीत सर्वाधिक 96.45 टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे.

या सर्व औषधांच्या सुधारित किमती 9 नोव्हेंबरपासून लागू झाल्या आहेत. त्यामुळे कॅन्सरच्या उपचारांसाठी औषधे खरेदी करणाऱ्या रुग्णांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Delhi Diwali Firecrackers Sale : मग प्रदुषण तर होणारचं ना! दिल्लीकरांनी एका दिवसात फोडले 300 कोटींचे फटाके

औषधांच्या किमतींची पडताळणी कशी कराल?

ग्राहकांना औषधांच्या पाकिटावर छापलेली सुधारित कमाल किरकोळ किंमत तपासता येणार आहे. तसेच ‘फार्मा सही दाम’ या मोबाइल ॲपद्वारे किंवा एनपीपीएच्या अधिकृत संकेतस्थळावर औषधांच्या किमतींची पडताळणी करता येईल.

महत्त्वाचे म्हणजे, कोणताही औषध विक्रेता किंवा रुग्णालयातील औषध दुकान सुधारित कमाल किरकोळ किमतीपेक्षा अधिक पैसे आकारू शकणार नाही. त्यामुळे औषध खरेदी करताना ग्राहकांनी पाकिटावरील सुधारित किंमत तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Earthquake : एकाच दिवशी तीन ठिकाणी भूकंपाचे धक्के; तिबेट, सोलोमन द्वीप हादरले, महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा समावेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत किती कपात झाली आहे?

    Ans: काही कॅन्सरविरोधी औषधांच्या कमाल किरकोळ किमतीत 96.45 टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे.

  • Que: केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रुग्णांची किती बचत होणार आहे?

    Ans: या निर्णयामुळे रुग्णांना दरवर्षी सुमारे 3,540.38 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे.

  • Que: किती कॅन्सर औषधांच्या सुधारित किमती लागू झाल्या आहेत?

    Ans: एकूण 1,364 कॅन्सरविरोधी औषधांच्या फॉर्म्युलेशन्सच्या सुधारित किमती लागू झाल्या आहेत.

Web Title: Cancer medicines price cut 96 percent patients savings rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • cancer
  • Central Governement
  • Medicine Strips

संबंधित बातम्या

Vasai Virar News : वसई-विरारमध्ये खळबळ! मुदतबाह्य औषध प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब; प्रकरण दडपण्याचा गंभीर आरोप
1

Vasai Virar News : वसई-विरारमध्ये खळबळ! मुदतबाह्य औषध प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब; प्रकरण दडपण्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.