ghaziabad conversion case shahnawaj khan
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद (Ghaziabad Conversion Case) इथे ऑनलाइन गेमच्या माध्यमातून धर्मांतरण करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आता होता. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मौलवी अब्दुल रहमान याला अटक (Arrest) केली आहे. या प्रकरणात आता पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड शाहनवाज खान (Shahnawaz Khan) याला अटक करण्यात आली आहे. त्याला गाडीने ठाण्यातून उत्तर प्रदेशमध्ये आणलं जाईल. (Conversion Case)
#WATCH महाराष्ट्र: मुंब्रा निवासी शाहनवाज खान उर्फ बद्दो, जिसकी गाजियाबाद पुलिस को एक कथित ऑनलाइन गेमिंग और धर्मांतरण रैकेट में तलाश थी, उसको मुंब्रा पुलिस स्टेशन से ठाणे कोर्ट ले जाया गया। pic.twitter.com/dHnSi9G9w6
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2023
उत्तर प्रदेश पोलिसांची दहशत
दरम्यान या प्रकरणात ठाणे कोर्टाने उत्तर प्रदेशच्या पोलिसांना निर्देश दिले आहेत की, आरोपीच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांची आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात गुंडांचा खात्मा केला जात आहेत. पोलीस कस्टडीत गुन्हेगारांच्या हत्या होतायत आणि गुन्हेगारांचा एनकाउंटर केला जातोय. त्यामुळे शाहनवाजला एनकाउंटरची भीती सतावतेय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा भागातील रहिवासी असलेला शाहनवाज खान उर्फ बद्दोचा गाजियाबाद पोलीस ऑनलाइन गेमिंग आणि धर्मांतरण रॅकेट प्रकरणात शोध घेत होते. त्याला मुंब्रा पोलीस स्टेशनमधूीन ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं.
ठाणे कोर्टातून त्याला उत्तर प्रदेशला नेलं जाईल. शाहनवाजला उत्तर प्रदेश पोलिसांकडून एनकाउंटर होण्याची भीती वाटत असल्याची चर्चा सुरु आहे. शाहनवाज खान आणि गाजियाबादमधल्या मशीदीच्या एका मौलवींविरोधात अवैध धर्म परिवर्तन निषेध अधिनियमाअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी खूप वेगाने या रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणातील आरोपींना अटक केली. या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंट शाहनवाज खानला अटक झाली आहे.
धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश
ही धर्मांतरण करणारी मोठी टोळी असून ती ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात या मुलांना हरवलं जातं, मग त्यात फसवलं जातं आणि पुढे त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केला जातो. ही मुलं ऑनलाईन गेमच्या माध्यमातून डर्टी धर्मांतराचे शिकार होतात. दिल्लीच्या गाझियाबादमध्ये देखील असंच घडलं. ऑनलाईन गेमच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांचं धर्मांतर केलं गेले आहे. गाझियाबादमधल्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी शाहनवाज मकसूद खानला ठाणे आणि गाझियाबाद पोलिसांनी एकत्र कारवाई करत अटक केली आहे.
ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होणाऱ्या धर्म परिवर्तनाबाबत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं की, आम्ही पहिल्यांदाच ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात एक रुपरेषा तयार केली आहे. त्यात आम्ही देशात तीन प्रकारच्या खेळांना परवानगी देणार नाही. सट्टेबाजीचा समावेश असलेले खेळ किंवा युझर्ससाठी हानिकारक खेळ आणि व्यसन लागेल अशा खेळांवर बंदी घालण्यात येईल.