Secret treasure found by river bank in Uttar Pradesh
जम्मू काश्मीरमधील (jammu kashmir) रियासी जिल्ह्यात नुकताच लिथियम धातुचा (Lyrhium) साठा आढळला होता. आता ओडिशामधुन (Odisha) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याच्या खाणी (Gold Mines) सापडल्या आहेत. पोलाद आणि खाण मंत्री प्रफुल्ल मल्लिक यांनी सोमवारी विधानसभेत ही माहिती दिली.
ज्या तीन जिल्ह्यांतील ज्या भागात सोन्याचा साठा आढळल आहे, त्यामध्ये दिमिरमुंडा, कुष्कला, गोटीपूर, केओंझार जिल्ह्यातील गोपूर, मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, देवगड जिल्ह्यातील सुरियागुडा, रुन्सिला, धुशुरा हिल आणि अडास यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील पहिले सर्वेक्षण खाण आणि भूविज्ञान संचालनालय आणि GSI यांनी 1970 आणि 80 च्या दशकात केले होते. दरम्यान आता, राज्याचे खाण मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक यांनी माहिती दिली की, जीएसआयने गेल्या दोन वर्षांत या तीन जिल्ह्यांमध्ये आणखी एक सर्वेक्षण केले आहे. ढेंकनालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी विधानसभेत सोन्याच्या साठ्याशी संबंधित प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना प्रफुल्ल कुमार यांनी तीन जिल्ह्यांमध्ये ‘सोन्याचा खजिना’ मिळण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, सध्या तीन जिल्ह्यांत सापडलेल्या सोन्याच्या साठ्यात किती सोन्याचे प्रमाण आहे, हे स्पष्ट झालेले नाही
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहने आणि सौर पॅनेल बनवण्यासाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा धातू लिथियमचा ५९ लाख टन साठा शोधून काढला आहे.