Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आता नवीन वाहने खरेदी करू नका, सरकार डिझेलमध्येही इथेनॉल टाकणार’; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान

पेट्रोलमध्ये ५० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळणार आहेत. ते फक्त परिस्थिती शांत होण्याची वाट पाहत आहेत. आधी त्यांनी तुमच्या E-0 आणि E-10 गाड्यांमध्ये जबरदस्तीने E-20 पेट्रोल, टाकून त्या खराब केल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2026 | 08:38 AM
सरकार डिझेलमध्येही इथेनॉल टाकण्याच्या तयारीत

सरकार डिझेलमध्येही इथेनॉल टाकण्याच्या तयारीत

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्र सरकार डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना आखत आहे. लोकांनी पुढील काही वर्षे नवीन वाहने खरेदी करू नये, असे आवाहन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केले. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये केजरीवाल यांनी आरोप केला की, E-20 इंधन प्रणाली लागू केल्यानंतर सरकार पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढवण्याची योजना आखत आहे.

पेट्रोलमध्ये ५० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळणार आहेत. ते फक्त परिस्थिती शांत होण्याची वाट पाहत आहेत. आधी त्यांनी तुमच्या E-0 आणि E-10 गाड्यांमध्ये जबरदस्तीने E-20 पेट्रोल, टाकून त्या खराब केल्या. आज जर तुम्ही नवीन E-20 गाडी विकत घेतली, तर काही काळानंतर सरकार त्यात जबरदस्तीने E-50 पेट्रोल टाकून ती गाडी खराब करेल. E-20 पेट्रोल म्हणजे असे इंधन ज्यात २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के सामान्य पेट्रोल असते. केजरीवाल यांनी दावा केला आहे की, सरकार लवकरच डिझेलमध्ये इथेनॉल मिसळणार आहे.

विमानाच्या सुरक्षेला धोका होण्याची शक्यता

मोदी सरकार एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना आखत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, याचा विमान सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला, केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून E-20 पेट्रोलच्या अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी मागणी केली की, पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल आणि E-20 इंधन दोन्ही उपलब्ध करून द्यावे आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोलची किंमत कमी करावी.

‘मेटा’कडून स्पष्ट माहितीचा अभाव

केजरीवाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मेटाच्या भारतीय कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना समजले की, त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे आणि ते भारतात उपलब्ध नाही. ‘एक्स’ वर एक व्हिडिओ शेअर करत केजरीवाल म्हणाले, मेटाने या प्रकरणी तत्काळ प्रतिसाद दिला नाही.

पंतप्रधानांसमोर झुकू नका

केजरीवाल यांनी त्यांच्या खात्याच्या स्टेटसचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला, ज्यावर काही ठिकाणी उपलब्ध नाही, असे लिहिले होते. त्यांनी कंपनीकडून स्पष्ट माहितीचा अभाव आणि प्रतिसादाला अत्यंत निकृष्ट सेवा म्हटले आणि कंपनीला सांगितले, पंतप्रधानांपुढे झुकू नका.

E-20 विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर घेऊन जाणार मोर्चा, 2.33 लाख लोकांच्या…

Web Title: Government to blend ethanol in diesel too says arvind kejriwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • Ethanol Petrol

संबंधित बातम्या

E-20 विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर घेऊन जाणार मोर्चा, 2.33 लाख लोकांच्या…
1

E-20 विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर घेऊन जाणार मोर्चा, 2.33 लाख लोकांच्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.