नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणासह जम्मू-कश्मीर या राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होईल 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर य़ा तीन दिवशी जम्मू कश्मीरमध्ये मतदान होईल. तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबर रोजी मतदान होईल, या दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी होईल, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत घोषणा केली आहे.
राजीव कुमार म्हणाले, ” जम्मू कश्मीरमध्ये एकूण 11,838 मतदान केंद्र असतील, तर 87.09लाख मतदार असतील. यात 20 लाखांहून अधिक नवमतदार आहेत. 20 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधील मतदार यादी जाहीर होईल. तर हरियांणामध्ये 90 विधानसभेच्या जागा आहेत. याठिकाणी 2.01 कोटी मतदार आहेत. याठिकाणी 20,629 हजार मतदान केंद्र असतील. 27 ऑगस्टला हरियाणातील मतदारांची यादी जाहीर होईल.
हेदेखील वाचा: हरियाणासह जम्मू-कश्मीर विधानसभेचा बिगूल वाजणार; निवडणूक आयोग करणार घोषणा
यापूर्वी 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा 87 जागा होत्या, पण आता सीमांकनानंतर केंद्रशासित प्रदेशातील जागांची संख्या 90 झाली आहे. जेव्हा जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले नव्हते.
राजीव कुमार म्हणाले, ” निवडणूक आयोग वातावरण बदलण्याची वाट पाहात होते. देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या. देशात जणूकाही उत्सवाचे वातावरण होते. जेव्हा जेव्हा देशात निवडणूका होतील. त्यात आपल्या निवडणुकांचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीत लोकांनी हिंसाचार नाकारला. जम्मू कश्मीरच्या लोकांनी बंदूका नाकारल्या आणि मतदानाला स्वीकारले. हा सर्वात मोठा चमत्कार होता. मतदानाच्या माध्यमातून लोकांनी हिंसाचार नाकारला. यात केवळ महिला आणि वृद्धांचाच नव्हे तर युवा तरुणांचा सर्वात मोठा सहभाग होता.
हेदेखील वाचा: ISRO ने श्रीहरिकोटा येथून SSLV मिशनचे शेवटचे रॉकेट केले लाँच; जाणून घ्या मोठे अपडेट्स
हरियाणात विधानसभेच्या 90 जागांसाठी निवडणुका होणार आहेत, राज्यात जवळपास 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपला केवळ 40 जागा जिंकता आल्या, बहुमतापेक्षा 6 जागा कमी, परंतु अपक्ष आणि जेजेपी यांच्याशी युती करून सरकार स्थापन करण्यात यश मिळाले.
तर जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकनानंतर जागांची संख्या 114 झाली आहे. यापैकी 24 जागा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये आहेत, तर 90 जागांपैकी 47 जागा काश्मीर विभागात येतात आणि 43 जागा जम्मू विभागात येतात. 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या, त्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली भाजप-पीडीपी युतीचे सरकार स्थापन झाले होते. 2018 मध्ये ही युती तुटली आणि ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले, त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत.