Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता गर्भवती महिलांच्या पतींचीही होणार ‘HIV’ आणि ‘सिफलिस’ चाचणी; ‘या’ सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवी पॉलिसी

राज्यातील गर्भवती महिलांसोबतच आता त्यांच्या पतींचीही 'एचआयव्ही' आणि 'सिफलिस' (Syphilis) चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 05, 2026 | 05:37 PM
आता गर्भवती महिलांच्या पतींचीही होणार ‘HIV’ आणि ‘सिफलिस’ चाचणी (Photo Credit- AI)

आता गर्भवती महिलांच्या पतींचीही होणार ‘HIV’ आणि ‘सिफलिस’ चाचणी (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • आता गर्भवती महिलांच्या पतींचीही होणार ‘HIV’ आणि ‘सिफलिस’ चाचणी
  • ‘या’ सरकारचा मोठा निर्णय
  • पाहा काय आहे नवी पॉलिसी
देशातील एड्स (HIV AIDS) आणि इतर गंभीर आजारांचा प्रसार रोखण्यासाठी हरियाणा सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील गर्भवती महिलांसोबतच आता त्यांच्या पतींचीही ‘एचआयव्ही’ आणि ‘सिफलिस’ (Syphilis) चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आईकडून बाळाला होणारा संसर्ग रोखणे आणि सुरक्षित मातृत्वाला चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

‘हरियाणा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी’च्या बैठकीत शिक्कामोर्तब

चंदीगड येथे पार पडलेल्या हरियाणा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या (HSACS) 23 व्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत या धोरणावर अंतिम चर्चा करण्यात आली. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुमिता मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, राज्यातील नोकरीपेशा महिलांसाठी ‘एचआयव्ही एड्स कार्यस्थळ धोरण’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, आता गर्भवती महिलांच्या पतींची तपासणी करणे प्रशासनासाठी बंधनकारक असेल.

‘या’ निर्णयामुळे गर्भस्थ बाळाचे आरोग्य राहणार सुरक्षित

सरकारने हे धोरण लागू करण्यामागे वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणे स्पष्ट केली आहेत. आईकडून बाळाला एचआयव्ही आणि सिफलिस यांसारख्या आजारांचा होणारा संसर्ग वेळीच रोखता येईल. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (NACO) यावर्षी हरियाणात सुमारे 6 लाख (5,95,880) चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. भविष्यात दरवर्षी 12 लाख चाचण्या करण्याचे सरकारचे नियोजन आहे. गर्भस्थ बाळाला या दोन्ही जीवघेण्या आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पतीची आरोग्य स्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षांनंतर जोडप्याला घटस्फोट, एकाच दिवशी ६१ खटले निकाली

47 कोटींचा निधी आणि पंचकुलात नवीन अत्याधुनिक लॅब

या मोहिमेसाठी सरकारने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी 47.16 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली आहे.

1. नवी प्रयोगशाळा: सध्या रोहतक येथील पीजीआयएमएस (PGIMS) मध्ये एक लॅब कार्यरत आहे, जी १७ जिल्ह्यांना सेवा देते. आता पंचकुला येथे दुसरी अत्याधुनिक ‘HIV व्हायरल लोड लॅब’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

2. डिजिटल मॉनिटरिंग: बाधित व्यक्तींच्या (PLHIV) उपचारांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हॉईस मेसेज आणि अलर्ट सिस्टीम विकसित केली जाणार आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर औषधे आणि फॉलो-अपची आठवण करून दिली जाईल.

एचआयव्ही आणि सिफलिस म्हणजे नक्की काय?

  • HIV: हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवर (White Blood Cells) हल्ला करतो. यामुळे शरीर कमकुवत होऊन टीबी, कॅन्सर किंवा इतर गंभीर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. उपचार न मिळाल्यास याचे रूपांतर ‘एड्स’मध्ये (AIDS) होते.
  • सिफलिस (Syphilis): हा एक गंभीर लैंगिक संक्रमित आजार (STI) आहे, जो ‘ट्रेपोनेमा पॅलिडम’ नावाच्या बॅक्टेरियामुळे पसरतो. योग्य वेळी निदान झाल्यास यावर उपचार शक्य आहेत.

आता नो टेन्शन…! जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना, काय आहे याची प्रक्रिया? जाणून घ्या स्टेप्स

Web Title: Haryana government mandatory hiv syphilis test for husbands of pregnant women new policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Haryana News
  • Pregnant woman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.