Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन ऑक्टोबरमध्ये देशातील ‘या’ राज्यात मुसळधार पाऊस; तब्बल 1.46 लाख लोकांना फटका, अक्षरश: बर्फवृष्टीच सुरु

चेन्नईतील जलाशयातील पातळीत झपाट्याने वाढ झाल्यानंतर तीन प्रमुख धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, हिमाचल प्रदेशातील उंचावरील भागात बुधवारी सकाळी हवामान बदलल्याचे पाहिला मिळाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2025 | 08:16 AM
ऐन ऑक्टोबरमध्ये देशातील 'या' राज्यात मुसळधार पाऊस; तब्बल 1.46 लाख लोकांना फटका

ऐन ऑक्टोबरमध्ये देशातील 'या' राज्यात मुसळधार पाऊस; तब्बल 1.46 लाख लोकांना फटका

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी अद्यापही पाऊस होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हिट’चा सामना करावा लागत आहे. असे असताना आता तामिळनाडूला मात्र मुसळधार पावसाने झोडपून काढले. तामिळनाडूमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे आणि अनेक जिल्ह्यांतील भात पिके पाण्याखाली गेली आहेत. या मुसळधार पावसाचा राज्यातील तब्बल 1.46 लाख लोकांना फटका बसला आहे.

चेन्नईतील जलाशयातील पातळीत झपाट्याने वाढ झाल्यानंतर तीन प्रमुख धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, हिमाचल प्रदेशातील उंचावरील भागात बुधवारी सकाळी हवामान बदलल्याचे पाहिला मिळाले. कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि लाहौलमध्ये हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली. आग्नेय अरबी समुद्रातील एक खोल कमी दाबाचा पट्टा पुढील 24 तासांत उत्तर-वायव्येकडे सरकेल. तामिळनाडू किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा पट्टा पुढील 12 तासांत कमी दाबात रूपांतरित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्यात आणखी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

याशिवाय, चेन्नई जलसंपदा विभागाने चेंबरंबक्कम, पूझल (रेड हिल्स) आणि पुंडी धरणांमधून अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे समुद्रात वाहून नेण्यासाठी सतर्कतेने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे लोकांनी घाबरू नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

मेत्तूर धरण तुडूंब भरले

राज्यातील सर्वात मोठे मेत्तूर धरण १२० फूट क्षमतेपर्यंत पोहोचले आहे. धरणातून ३६४८४ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे, तर ३५७४१ क्युसेक पाणी सोडले जात आहे. सततच्या पावसामुळे विल्लुपुरम बसस्थानक पाण्याखाली गेले होते, ज्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय झाली. अनेक बसस्थानकाबाहेरून धावत होत्या, त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून जावे लागले. चेन्नई पोलिस आणि महानगरपालिकेचे पथक रस्त्यांवरील पाणी काढण्याचे आणि पडलेली झाडे काढण्याचे काम करत असल्याचे दिसून आले.

ऐन दिवाळीत मुसळधार पाऊस

गेले काही दिवस देशभरात वातावरणात अनेक प्रकारचे बदल दिसून येत आहेत. मध्येच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी कडकडीत उन्हाळा तर काही ठिकाणी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. आता दिवाळीला सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन दिवाळीत देखील काही राज्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : India Rain Alert: हा खेळ पावसाचा! ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना झोडपणार, पहा आजचे हवामान

Web Title: Heavy rain in tamil nadu state as many as 1 46 lakh people were affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 07:21 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Rain News

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: ‘लक्ष्मीपूजना’ला वरूणराजाने लावली हजेरी; मुंबईसह ‘या’ भागात केला कहर
1

Maharashtra Rain Alert: ‘लक्ष्मीपूजना’ला वरूणराजाने लावली हजेरी; मुंबईसह ‘या’ भागात केला कहर

India Rain Alert: हा खेळ पावसाचा! ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना झोडपणार, पहा आजचे हवामान
2

India Rain Alert: हा खेळ पावसाचा! ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना झोडपणार, पहा आजचे हवामान

Flood Relief: राज्यातील ‘या’ पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; रक्कम वितरित करण्यास…
3

Flood Relief: राज्यातील ‘या’ पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; रक्कम वितरित करण्यास…

India Weather Update: कुठे जोरदार पाऊस तर कुठे…; आज कसे असणार देशातील वातावरण?
4

India Weather Update: कुठे जोरदार पाऊस तर कुठे…; आज कसे असणार देशातील वातावरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.