Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश; केदारनाथमध्ये घडली दुर्दैवी घटना, पहा Video

केदारनाथमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. आज सकाळच्या सुमारास हे  हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 17, 2025 | 02:32 PM
मोठी बातमी! रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश; केदारनाथमध्ये घडली दुर्दैवी घटना, पहा Video

मोठी बातमी! रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश; केदारनाथमध्ये घडली दुर्दैवी घटना, पहा Video

Follow Us
Close
Follow Us:

डेहराडून: केदारनाथमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. आज सकाळच्या सुमारास हे  हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. लॅंडींग करत असताना ही घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये एक डॉक्टर आणि तीन प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत मात्र 4 ही जण सुरक्षित आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर हे रूग्णांना घेऊन एम्स मध्ये जात होते.

केदारनाथ में बड़ा हादसा होने से बचा,
दो चिकित्सकों को केदारनाथ ले जा रहा हेलीकॉप्टर क्रैश होते बचा,एयर एम्बुलेंस में तकनीकी खराबी आने से इमरजेंसी लैंडिंग करनी पड़ी, यह एयर एम्बुलेंस AIIMS ऋषिकेश की है pic.twitter.com/kSRjWDMgax

— Abhishek Dwivedi /अभिषेक द्विवेदी 🇮🇳 (@Dubeyjilive) May 17, 2025

एम्स ऋषिकेशचे हेलिकॉप्टरला केदारनाथ क्रॅश लॅंडींग करायला लागले. हेलिकॉप्टरच्या मागील भागात अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये एक डॉक्टर, एक पायलट आणि आणि एक रूग्णालायचा सदस्य प्रवास करत होते. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तीनही प्रवासी सुखरूप आहेत.

गढवाल कमिशनर विनय पांडे यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर योग्य रीतीने लँड झाले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अचानक हेलिकॉप्टर लँड करण्यामागे तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी घटना टळली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले. मात्र नियोजित ठिकाणी लँड करण्याआधीच हेलिकॉप्टरला क्रॅश लॅंडींग करावे लागले. पायलटच्या हुशारीने मोठा प्रसंग टळला असे, रुद्रप्रयागचे जिल्हा पर्यटन अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्तामध्ये केदारनाथ धामचे दरवाजे उघडले

केदारनाथ धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यामुळे भाविकांमध्ये एकच उत्साह आहे. मात्र नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये एक प्रकारे भीती देखील निर्माण होण्याची शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर केदारनाथमध्ये कटेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र केदारनाथमध्ये पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यामुळे दहशतवादी हल्ल्यांना एकप्रकारे भारतीयांनी चपराक लगावली आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

हिवाळ्यामध्ये केदारनाथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होत असते. यामुळे मंदिर परिसरामध्ये बर्फाचा अक्षरशः खच पडलेला असतो. यामुळे केदारनाथ धाम हे सहा महिन्यांसाठी बंद असते. यानंतर मंदिर सुरु होते. भाविकांसाठी आता मंदिरे खुले करण्यात आले आहे. त्यापूर्वी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि आरास करण्यात आली. याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हर हर महादेव जयघोषात केदारनाथ दुमदुमले

बाबा केदारनाथ यांचा पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी सोहळा देखील पार पडला आहे. गुरुवारी (दि.01) दुपारी ही पालखी भगवान केदारनाथाच्या जयघोषामध्ये केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. यासाठी गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. ‘हर हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात केदारथाम दुमदुमून गेलं. यानिमित्त केदारनाथ मंदिर 108 क्विटल फुलांनी सजवण्यात आले आहे.

 

 

 

Web Title: Helicopter carrying patients crashes in kedarnath video accident marathi big breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • accident video
  • helicopter crash
  • Kedarnath
  • Kedarnath News

संबंधित बातम्या

एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL
1

एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral
2

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral

मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral
3

मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral

एक चूक अन्…! घाईने व्हॅन घेऊन पठ्ठ्या रेल्वे क्रॉसिंगवर घुसला पुढच्याच क्षणी…; भयावह अपघाताचा VIDEO व्हायरल
4

एक चूक अन्…! घाईने व्हॅन घेऊन पठ्ठ्या रेल्वे क्रॉसिंगवर घुसला पुढच्याच क्षणी…; भयावह अपघाताचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.