हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; चौथ्यांदा बनले थारखंडचे मुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर हेमंत सोरेन यांनी गुरुवारी दुपारी 4 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांचीतील मोरहाबादी मैदानात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल संतोष गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा राज्याची धुरा हाती घेतली आहे. शपथविधी समारंभात जेएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकमधील उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांसह इंडियाचे नेते उपस्थित होते.
अबुआ सरकार का शपथ ग्रहण समारोह…
जय झारखण्ड!
जय जय झारखण्ड! https://t.co/7uPQnxY8Cd— Hemant Soren (@HemantSorenJMM) November 28, 2024
निवडणुकीसंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शपथविधी समारंभापूर्वी हेमंत सोरेन जेएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. येथे त्यांनी आपल्या मातापित्यांचे आशीर्वाद घेतले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर “अबुआ सरकारच्या शपथविधीपूर्वी बाबा दिशोम गुरुजी आणि आईचे आशीर्वाद घेतले.” असं त्यांनी म्हटलं आहे.
अबुआ सरकार – हर झारखण्डी की सरकार
अबुआ सरकार – INDIA गठबंधन की सरकार pic.twitter.com/jgxLuGRAs1— Hemant Soren (@HemantSorenJMM) November 28, 2024
आज फक्त हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली. कॅबिनेट विस्तार नंतर केला जाणार आहे. राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात असताना, हेमंत सोरेन यांनी एकट्याने शपथ घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 2019 मध्ये हेमंत सोरेन यांनी 3 मंत्र्यांसोबत शपथ घेतली होती. त्यावेळी काँग्रेसच्या कोट्यातून 2 मंत्र्यांनी त्यांच्यासोबत शपथ घेतली होती.
अबुआ सरकार के शपथ ग्रहण से पहले आदरणीय बाबा दिशोम गुरुजी और मां का आशीर्वाद लिया… pic.twitter.com/M0cgK6T2LN
— Hemant Soren (@HemantSorenJMM) November 28, 2024
हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांची बहिण अंजनी सोरेन म्हणाल्या, “आज संपूर्ण झारखंड आनंदित आहे. आम्हाला आधीच विश्वास होता की आम्ही निवडणुकीत पूर्ण बहुमताने विजय मिळवू.”
राजकारणासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्विक करा
हेमंत सोरेन यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी रांची पोहोचलेले आरजेडीचे नेते तेजस्वी यादव म्हणाले, “हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवू आणि झारखंडच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू”
हेमंत सोरेन यांनी बरहेट सीटवर विधानसभा निवडणूक लढवली होती. येथे त्यांनी भाजपच्या गमलियल हेम्ब्रम यांचा 39,791 मतांनी पराभव केला. जेएमएम (झारखंड मुक्ति मोर्चा) नेतृत्वाखालील महाआघाडीने 81 जागांपैकी 56 जागांवर विजय मिळवला तर भाजप-नेतृत्वाखालील एनडीएला 24 जागांवर विजय मिळवता आला आहे.