हिमाचलमध्ये मान्सूनचा कहर! 5 ठिकाणी ढगफुटी, अख्खी इमारत कोसळली, 4 जणांचा मृत्यू तर 50 जण बेपत्ता (फोटो सौजन्य-ट्विटर)
हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्णातील मलाना गावात बांधण्यात आलेल्या वीज प्रकल्पाचा बांध फुटला आहे. बंधारा फुटून खोऱ्यात पूर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे बियास नदीचा प्रवाह ही वाढला आहे. मनाली शहराजवळ व्हास नदीने रस्त्यांचे नुकसान केल्याचे पाहायला मिळत आहे.
भूस्खलनामुळे चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद आहे. दरम्यान अनेक घरे, शाळा आणि रुग्णालयांचे नुकसान झाले आहे. चार ठिकाणांहून सुमारे 50 लोक अद्याप बेपत्ता आहेत. चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मंडी जिल्ह्यात 35 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ढगफुटीच्या घटनेनंतर आज (1 ऑगस्ट) मंडई परिसरातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. डीसींनी आदेश जारी केले आहेत. कुल्लूमध्येही 2 ऑगस्टला सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पार्वती नदीला पूर आल्याने भुंतर परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पार्वती आणि बियास नदीत शाळा आणि घरे वाहून गेली आहेत. पार्वती नदीत मणिकरण खोऱ्यातील भाजी मार्केट वाहून गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेह मनाली हायवे पलचनजवळ बंद करण्यात आला आहे. याशिवाय बियास नदीच्या भीषण स्वरूपामुळे चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी तुटला आहे. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. दुसरीकडे पार्वती नदीच्या पुरात भाजी मार्केटची मोठी इमारत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
मंडईतील थलतुखोड येथे मध्यरात्री झालेल्या ढगफुटीने मोठी नासधूस केली. मुसळधार पावसामुळे 7 मजली इमारती कोसळली आहे. रस्ते संपर्कही ठप्प झाले आहे. थलतुखोड पंचायत प्रमुख काली राम यांनी सांगितले की, तेरंग आणि राजबन गावात ढगफुटीची घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण बेपत्ता आहेत. तीन घरे उडून गेल्याची माहिती आहे.
केरल में सैकड़ों लोगों ने अपनी जान गंवाई, नैनीताल में कार ऐसे बही, और आज सुबह कुल्लू में एक इमारत ढह गई। संसद भी नहीं बच पाया। हर तरफ तबाही का मंजर है। #Tragedy #KeralaFloods #NainitalDisaster #KulluBuildingCollapse #HimachalPradesh #Manikaran pic.twitter.com/PKC0ru4mCf
— Prabhakar Kumar (@prabhakarjourno) August 1, 2024
थलतुखोड येथील ढगफुटीच्या घटनेत आठ जण बेपत्ता, दोघांचे मृतदेह सापडले आहेत. एकजण जखमी झाला आहे. 35 जण सुरक्षित आहेत. मंडी जिल्हा प्रशासनाने हवाई दलाला बचावासाठी सतर्क केले आहे. जेव्हा मदतीची आवश्यकता असेल तेव्हा सेवा मागितल्या जातील. एनडीआरएफलाही मदतीची विनंती करण्यात आली आहे. डीसी अपूर्व देवगण आणि बचाव पथकांना पायीच बाधित भागात पाठवण्यात आले. घटनास्थळी उपस्थित स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे. तुटलेले रस्ते व पथदिवे यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास अडचण होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे महसूल मंत्र्यांसह हेलिकॉप्टरने शिमल्याला रवाना झाले आणि समेळ खड्ड्यातील ढगफुटीच्या घटनेमुळे प्रभावित झालेल्या भागाची पाहणी केली. घटनास्थळी पोहोचल्यावर ते बाधित लोकांची भेट घेतील आणि बचाव कार्याची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 50 लोक बेपत्ता आहेत.
हिमाचलमधील लोकांना नदी-नाल्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवाई दलालाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सर्व अधिकारी आढावा घेत असल्याचे सांगितले. महसूलमंत्र्यांसह घटनास्थळी रवाना झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दोन एनडीआरएफ टीम पाठवण्यास सांगितले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशीही चर्चा झाली आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जीवित व वित्तहानी झाली आहे. हे आव्हान आम्ही युद्धासारखे लढत आहोत. केंद्राला आपत्तीत मदत करण्याचे आवाहन केले.