
हिमाचल प्रदेशमध्ये झाला भीषण स्फोट
नालागड परिसरात असणाऱ्या पोलिस ठाण्याजवळ घटना
आर्मी हॉस्पिटल अन् बिल्डिंगच्या काचा फुटल्या
हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठी घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशच्या नालागड भागात एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाची तीव्रता उतकी होती की शेजारी बिल्डिंग आणि आर्मी हॉस्पिटलच्या काचा देखील तुटल्या आहेत. हा स्फोट सोलन जिल्ह्यात घडला आहे. सोलन जिल्हा ब्लास्टमुळे हादरला आहे.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळील बिल्डिंग आणि लष्करी रूग्णालयाच्या काचा फुटल्या आहे. या स्फोटाचा आवाज 400 ते 500 मीटर पर्यंत ऐकू गेल्याचे म्हटले जात आहे. तब्बल पोलिसांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे. या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नालागड येथे पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. शिमला येथून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या स्फोटात पोलिस स्टेशनची इमारत, बाजार समितीचे कार्यालय आणि लष्करी रूग्णालयाचे नुकसान झाले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, लोक घाबरले आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
मशिदीत नमाज पठणावेळी भीषण स्फोट
सीरियातील होम्स शहरातील अलावाइट अल्पसंख्याकांच्या मशिदीत झालेल्या स्फोटात किमान ६ जण ठार झाले आणि २१ जण जखमी झाले. सीरियाने या हल्ल्याचे वर्णन दहशतवादी हल्ला म्हणून केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीरियातील होम्स शहरातील अलावाइट मुस्लिम समुदायाच्या इमाम अली इब्न अबी तालिब मशिदीत शुक्रवारी स्फोट झाला. शुक्रवारच्या नमाजासाठी मशिदीत सर्वाधिक गर्दी असताना हा स्फोट झाला.
स्फोटात किमान ६ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी
सीरियन अरब न्यूज एजन्सी (SANA) नुसार, प्राथमिक आकडेवारीनुसार स्फोटात किमान सहा जण ठार झाले आणि २१ जण जखमी झाले. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी नजीब अल-नासन यांनी सांगितले की, ही आकडेवारी प्राथमिक आहे आणि ती वाढू शकते. स्फोटानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे आणि तपास सुरू आहे. हल्ल्यादरम्यान मशिदीत उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी प्रार्थनागृहात एक शक्तिशाली स्फोट झाल्याचे वृत्त दिले, ज्यामुळे छत आणि भिंती कोसळल्या. घटनेनंतर, बचाव पथकांनी तीन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढले आणि अनेक महिला आणि मुलांसह डझनभराहून अधिक जखमींना जवळच्या शहरांमधील फील्ड हॉस्पिटल आणि सुविधांमध्ये हलवले. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना शस्त्रांच्या जखमा, भाजणे आणि फ्रॅक्चर झाल्याचे आढळले आहे.