Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाचा फटका ! डोळ्यात अश्रू, तब्बल 35 किमीपर्यंत पतीने खाद्यांवर नेला पत्नीचा मृतदेह

गेल्या अनेक दिवसांपासून कठुआ जिल्ह्यात पाऊस पडत आहे आणि २४ ऑगस्ट रोजी सकाळी बाणीसह जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडला.. या परिस्थितीत भूस्खलनामुळे गुलशनच्या गावाकडे जाणारा रस्ताही बंद झाला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2025 | 11:33 AM
डोळ्यात अश्रू, पत्नीचा मृतदेह खांद्यावर; तब्बल 35 किमीपर्यंत पतीने नेला पत्नीचा मृतदेह

डोळ्यात अश्रू, पत्नीचा मृतदेह खांद्यावर; तब्बल 35 किमीपर्यंत पतीने नेला पत्नीचा मृतदेह

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : खडकाळ मार्ग, डोळ्यात अश्रू आणि पत्नीचा खांद्यावर मृतदेह. गुलशन कुमार या व्यक्तीला या संकटातून जावे लागले. त्याची पत्नी उषा देवी यांचे मृतदेह गावी नेण्यासाठी त्याला 35 किमी चालावे लागले. सोमवारी रात्री उशिरा तो धग्गरला पोहोचला. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे कठुआ ते धग्गरचा थेट रस्ता संपर्क तुटला. अशा परिस्थितीत तो हिमाचलमार्गे गावात पोहोचला, ज्यामुळे पाच तासांच्या प्रवासाला 18 तास लागले.

पावसाने कठुआ जिल्ह्यातील धग्गर येथील रहिवासी गुलशन कुमारसाठी आयुष्यातील सर्वात कठीण दिवस आणले. त्याची पत्नी गर्भवती होती. तिला बानी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवजात बाळाचा मृत्यू झाला, असे गुलशनच्या नातेवाईकाने सांगितले. उषाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी तिला जीएमसी कठुआ येथे रेफर करण्यात आले. २४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता तिचा मृत्यू झाला. तिच्या वडिलोपार्जित गावी धग्गरमध्ये अंत्यसंस्कार करावेत, अशी कुटुंबाची इच्छा होती.

हेदेखील वाचा : Delhi CM Attack News : काहीतरी मोठं करण्याचा प्लॅन; रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचे गुजरात कनेक्शन आले समोर

गेल्या अनेक दिवसांपासून कठुआ जिल्ह्यात पाऊस पडत आहे आणि २४ ऑगस्ट रोजी सकाळी बाणीसह जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडला.. या परिस्थितीत भूस्खलनामुळे गुलशनच्या गावाकडे जाणारा रस्ताही बंद झाला होता. रस्ता बंद असल्याने तो कठुआहून थेट त्याच्या गावी धग्गरला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने हिमाचलमार्गे जाण्याचा निर्णय घेतला.

रुग्णवाहिकेने निघाला पण…

गुलशन सोमवारी सकाळी त्याच्या पत्नीचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेने निघाला आणि हिमाचलमार्गे मश्का येथे पोहोचला. येथून तो पायी पेपडी गावात गेला. येथे तो पुन्हा गाडी घेऊन दुग्गन गावात पोहोचला. त्यानंतर तो तेथून १० किमी अंतरावर असलेल्या धग्गर गावात पोहोचला. संपूर्ण मार्गावर त्याला मृतदेह खांद्यावर घेऊन ३५ किमी चालावे लागले.

मुस्लिमांनीही दिला खांदा 

मश्का आणि पेपडी गावादरम्यान रस्त्यावर बोल्डर पडले आहेत. तेथून बाहेर पडणे कठीण झाले होते. मुस्लिम समाजातील लोकांनी मृतदेह खांद्यावर घेऊन त्यांना बाहेर पडण्यास मदत केली. वाटेत चिखल होता आणि पाऊस होता तरीही गुलशानची पावले थांबली नाहीत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

हेदेखील वाचा : राजस्थान, हिमाचलसह देशातील 14 राज्यांत पावसाचा हाहा:कार; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’, पुढील पाच दिवस…

Web Title: Husband carried wife body for 35 km incident in himachal pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • national news

संबंधित बातम्या

Chamoli Cloudburst News: उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हाहाःकार! ढगफुटीने विनाश, SDM सह घरांची मोडतोड, लोकंही गायब
1

Chamoli Cloudburst News: उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हाहाःकार! ढगफुटीने विनाश, SDM सह घरांची मोडतोड, लोकंही गायब

सरकारला Online Gaming Bill ची काय गरज? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा खुलासा
2

सरकारला Online Gaming Bill ची काय गरज? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा खुलासा

Delhi CM attack:मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याला काय आहे शिक्षेची तरतूद? या कलमांतर्गत दाखल होतो गुन्हा
3

Delhi CM attack:मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याला काय आहे शिक्षेची तरतूद? या कलमांतर्गत दाखल होतो गुन्हा

Delhi: DPS द्वारकासह 3 शाळेत बॉम्बने उडविण्याची धमकी, रिकामे करण्यात आले कॅम्पस
4

Delhi: DPS द्वारकासह 3 शाळेत बॉम्बने उडविण्याची धमकी, रिकामे करण्यात आले कॅम्पस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.