Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘केंद्रात नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर केसीआरला …’, राहुल गांधींचा तेलंगणात भाजपवर निशाणा

बीआरएस, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम एकत्र काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. केसीआर यांनी संसदेत मोदी सरकारचे समर्थन दिले होते. केसीआर यांच्यावर काही खटला आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की केसीआर सर्वात भ्रष्ट सरकार चालवतात.

  • By Aparna
Updated On: Nov 28, 2023 | 07:16 PM
rahul gandhi

rahul gandhi

Follow Us
Follow Us:

दिल्लीत नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय समितीचा (BRS) पराभव करणे आवश्यक आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले. हैदराबादमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी बीआरएस, भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम एकत्र काम करत असल्याचा आरोप केला. केसीआर यांनी संसदेत मोदी सरकारचे समर्थन केले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

केसीआर यांच्यावर काही खटला आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की ते (केसीआर) सर्वात भ्रष्ट सरकार चालवतात. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि प्राप्तिकर विभाग यांसारख्या केंद्रीय एजन्सी केसीआरच्या मागे का नाहीत यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

‘देशातील करोडो गरीब जनतेच्या हृदयात माझे घर ‘

राहुल गांधी म्हणाले की ते पंतप्रधानांशी लढत असल्याने, त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये 24 खटले नोंदवले गेले आहेत आणि न्यायालये त्यांना वेळोवेळी समन्स पाठवतात. ते म्हणाले की, मला पहिल्यांदाच बदनामीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. माझे सरकारी घर हिसकावले गेले. मी म्हणालो मला ते नको आहे. देशातील करोडो गरीब जनतेच्या हृदयात माझे घर आहे.

मी आणि माझी बहीण तेलंगणासाठी दिल्लीत असलेले सैनिक आहोत, असेही ते म्हणाले. तुम्हाला काही हवे असेल तर मला आणि माझ्या बहिणीला आदेश द्या, आम्ही उपस्थित राहू. तेलंगणातील लोकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करू. कारण जेव्हा इंदिरा गांधीजींची गरज होती तेव्हा तेलंगणातील जनतेने त्यांना साथ दिली आणि मदत केली. हे आम्ही कधीच विसरू शकत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ओवेसींवर निशाणा साधला

माजी काँग्रेस अध्यक्षांनी एआयएमआयएम प्रमुख ओवेसी यांच्यावरही टीका केली आणि त्यांच्याविरोधात किती खटले आहेत असा सवाल केला. ईडी आणि सीबीआय सारख्या एजन्सी नेहमीच आपल्या मागे असतात असा दावा करत राहुल गांधी यांनी ओवेसी यांच्यामागे कोणती एजन्सी आहे का असा सवाल केला. राहुल गांधी म्हणाले, “ओवेसीवर एकही खटला का नाही, असा प्रश्न पडतो, आणि उत्तर म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष मोदींना मदत करतात. काँग्रेसला नुकसान पोहोचवण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी एआयएमआयएम विविध राज्यात आपले उमेदवार उभे करत आहे.

Web Title: If kcr wants to defeat narendra modi at the centre rahul gandhi targets bjp in telangana nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2023 | 07:16 PM

Topics:  

  • BJP
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
1

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
2

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.