Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!

Prakash Ambedkar : छटपूजेवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं असताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला थेट सवाल केला आहे. ठाकरे बंधूंवर NSA अंतर्गत कारवाई करणार का, असा प्रश्न विचारतानाच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतही मोठे दावे केले आहेत.

  • By विवेक
Updated On: Nov 15, 2026 | 07:53 PM
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Follow Us
Follow Us:
  • छटपूजेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं
  • छटपूजेवरून प्रकाश आंबेडकरांचा भाजपला थेट सवाल
  • ठाकरे बंधूंवर NSA अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
 

Prakash Ambedkar on Chhath Pooja : छटपूजेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी भूमिका घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकरांनी भाजपला थेट सवाल करत ठाकरे बंधूंवर NSA कायद्यांतर्गत कारवाई करणार की नाही, याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरही मोठं विधान केलं.

छटपूजेवरून भाजपला घेरलं, ठाकरे बंधूंवर कारवाई करणार का?

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, छटपूजेच्या विरोधाची व्याप्ती आता वाढत असून हा विरोध भाषेच्या आधारावर होत असल्याचं दिसत आहे. भाषा हीदेखील स्वतंत्र अस्मितेचा भाग आहे. भाषेच्या आधारावर देश आणि राज्यांमध्ये फूट पडण्याची ठिणगी पडली आहे, असं त्यांनी म्हटलं.

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा

याच मुद्द्यावरून त्यांनी भाजपला सवाल केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर NSA कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे का, हे भाजपने स्पष्ट करावं. कारवाई झाली नाही, तर भाजपच्या अजेंड्यासाठी ठाकरे बंधूंचा वापर केला जात असल्याची आपली समजूत होईल, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.

दोन्ही राष्ट्रवादी भाजपच्या A टीम आणि B टीम?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलतानाही आंबेडकरांनी मोठा दावा केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपचे A टीम आणि B टीम असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार नसल्याचंही ते म्हणाले. सुनेत्रा पवार यांचं राजकीय वजन वाढवलं जात असून एकनाथ शिंदे यांना डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. शिंदे यांनी या परिस्थितीत सावध राहावं, असंही आंबेडकर म्हणाले.

मुंबईमध्ये छट पूजेला शिवसेनेकडून याआधी ही विरोध झाला होता. ही छट पूजा मुंबईत का? हा त्या विरोधाचा सूर होता. आताही शिवसेना उबाठा, मनसेने त्याचा विरोध केलाय. आता त्या विरोधाची व्याप्ती वाढली आहे. आताचा विरोध हा भाषा आधारित होतोय. भाषा ही सुद्धा सब नॅशनॅलिटी आहे, हे आपण लक्षात घ्यावे. भावनेच्या आधाराला धरून भाषेचा प्रश्न उपस्थित केला जातोय.
भाषेच्या आधारावर जगभरात राज्य, देश फुटले आहेत.
भाषेवरून द्वेषाची ठिणगी पाडणारे हे देशद्रोही आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांवर NSA कायद्या अंतर्गत कारवाई होणार कि नाही? याचा खुलासा भाजपने करावा. भाजपाने जर कारवाई केली नाही, तर भाजप स्वतःचा अजेंडा पुढे करण्यासाठी यांचा वापर करतंय हे स्पष्ट होईल. #छठ_पूजा #मुंबई — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 15, 2026

कर्जत वृक्षतोडीवरून सरकारवर निशाणा

दरम्यान, कर्जतमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. आदिवासींच्या माध्यमातून संबंधित कंपनी आणि सरकारवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.

या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करून याचिका फेटाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे छटपूजा, राष्ट्रवादीचं राजकारण आणि कर्जतमधील वृक्षतोड या तिन्ही मुद्द्यांवर आंबेडकरांच्या विधानांची चर्चा सुरू झाली आहे.

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला कोणता सवाल केला?

    Ans: छटपूजेच्या विरोधावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर NSA कायद्यांतर्गत कारवाई करणार का, याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

  • Que: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

    Ans: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपचे A टीम आणि B टीम असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

  • Que: सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत आंबेडकरांनी काय विधान केलं?

    Ans: सुनेत्रा पवार यांचं राजकीय वजन वाढवलं जात असून एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Web Title: Prakash ambedkar bjp thackeray brothers nsa ncp merger statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • BJP
  • Chhath Puja
  • MNS
  • raj thackeray
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा
1

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक
2

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले
3

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले

Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?
4

Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.