Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण

Devendra Fadnavis Chhath Pooja : मुंबईतील जुहू चौपाटीवर छठपूजेनिमित्त उत्तर भारतीय भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौपाटीवर उपस्थिती लावत भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी 2014 नंतर छठपूजेच्या व्यवस्थेत बदल केल्याचं सांगितलं.

  • By विवेक
Updated On: Nov 15, 2026 | 09:08 PM
fadnavis chhath pooja

fadnavis chhath pooja

Follow Us
Follow Us:
  • जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी
  • महापालिकेकडून भाविकांसाठी विशेष सोयी-सुविधा
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या छठपूजेच्या शुभेच्छा
 

Devendra Fadnavis Chhath Pooja : उत्तर भारतीय नागरिकांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणाऱ्या छठ पूजे वरून राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यावरुण सुरु झालेला हा वाद नदी प्रदूषण, मुंबईतील समुद्रात होणारी अस्वच्छता या विषयांपर्यंत येऊन पोहोचला. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर छठ पूजेनिमित्त भेट देऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या.

मुंबईत छठपूजेचा उत्साह पाहायला मिळत असून जुहू चौपाटीसह शहरातील विविध समुद्रकिनारे आणि तलाव परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उत्तर भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला.

यावेळी जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भेट दिली. सूर्यास्ताच्या वेळी त्यांनी छठी मैय्याचं दर्शन घेत भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी छठपूजेच्या व्यवस्थेबाबत 2014 नंतर झालेल्या बदलांचाही उल्लेख केला.

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

जुहू चौपाटीवर भाविकांचा जनसागर!

छठपूजेनिमित्त जुहू चौपाटीवर सकाळपासूनच भाविकांची वर्दळ पाहायला मिळाली. महिला आणि पुरुषांनी पारंपरिक पद्धतीने सूर्यदेवाची पूजा करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. महापालिका प्रशासनाकडूनही भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.

सूर्यास्ताच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौपाटीवर उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी समोर दोन समुद्र दिसत असल्याचं म्हटलं. एक समुद्र पाण्याचा, तर दुसरा समुद्र म्हणजे श्रद्धेने जमलेल्या जनतेचा महासागर असल्याचं सांगत त्यांनी उपस्थित भाविकांचं स्वागत केलं.

2014 नंतर छठपूजेची व्यवस्था बदलली!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात छठपूजेच्या आयोजनाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून मुंबईत छठपूजेचं आयोजन केलं जात आहे. मात्र, 2014 नंतर आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर येथील व्यवस्थेत बदल करण्यात आले.

छठ उत्सव महासंघ द्वारा आयोजित ‘छठ महापर्व’ में संबोधन… (छठ उत्सव महासंघ द्वारा आयोजित ‘छठ महापर्व’ | मुंबई | 15-11-2026)
#Maharashtra #Mumbai #ChhathPuja https://t.co/yE5yqeRejH
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2026

छठपूजेसाठी येणाऱ्या माता-भगिनी निर्जला व्रत करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. ही व्यवस्था कायम करण्याचं काम सरकारने केल्याचं त्यांनी सांगितलं.

सूर्यदेव आणि छठी मैय्याकडे मागितले आशीर्वाद

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सूर्यदेवाच्या महत्त्वावरही भाष्य केलं. सूर्याच्या आशीर्वादामुळेच सृष्टीचं जीवनचक्र सुरू असल्याचं सांगत त्यांनी सूर्यदेव, छठी मैय्या आणि पवित्र जल यांचं महत्त्व अधोरेखित केलं.

देव कोणत्याही जाती, धर्म किंवा प्रांतामध्ये भेदभाव करत नाहीत. प्रत्येकाला आशीर्वाद देतात, असं म्हणत फडणवीस यांनी सर्वांच्या मुला-बाळांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावं, अशी प्रार्थना केली. अखेरीस छठी मैय्याचा जयघोष करत त्यांनी सर्वांना छठपूजेच्या शुभेच्छा दिल्या.

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत छठपूजेचा उत्सव कुठे साजरा करण्यात आला?

    Ans: मुंबईतील जुहू चौपाटीसह विविध समुद्रकिनारे आणि तलाव परिसरात छठपूजेचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उत्तर भारतीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छठपूजेबाबत काय विधान केलं?

    Ans: 2014 नंतर सरकार स्थापन झाल्यावर छठपूजेसाठी येणाऱ्या माता-भगिनींना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

  • Que: छठपूजेमध्ये कोणाची पूजा केली जाते?

    Ans: छठपूजेमध्ये सूर्यदेव आणि छठी मैय्याची पूजा केली जाते. या सणात भाविक सूर्यास्ताच्या आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देऊन कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

Web Title: Devendra fadnavis chhath pooja juhu beach chhath puja mumbai 2014 facilities vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • BJP
  • Chhath Puja
  • CM Devendra Fadnavis
  • MNS
  • Mumbai News
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!
1

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा
2

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक
3

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

CNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG महागलं, आता किलोमागे मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
4

CNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG महागलं, आता किलोमागे मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.