IMd Alert To India: गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वच राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सर्वच राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक भागात जोरदार पाऊस सुरूच आहे. दरम्यान आज हवामान विभागाने अनेक राज्यांना इशारा दिला आहे.भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. आज हवामान विभागाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काय आहे हवामान?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये पाऊस होऊ शकतो. अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. प्रयागराज, बालिया, बरेली, आग्रा, झाशी, कानपूरसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नैनिताल, टिहरी, मंडी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. राजधानी डेहराडूनमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. आज उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, कर्नाटक, तामिळनाडू, पाँडिचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोणत्या राज्यांना यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा यांसह ओडिसा , छत्तीसगड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या राज्यांना यलो अलर्ट दिला आहे.