India Rain News: 'या' राज्यांना अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा; IMD च्या अलर्टने वाढवले टेन्शन
Rain Marathi News: देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे.राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज दिल्लीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. पर्वतीय राज्यांमध्ये म्हणजे खास करून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज हवामान विभागाने कोणत्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.
दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये आज मुसळधार पावसाचा देण्यात आला आहे. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी देखील या शहरात ऑर्डर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस दिल्लीत देखील जोरदार पाऊस होऊ शकतो.
उत्तराखंड-हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बॅटिंग
उत्तराखंड राज्यातील काही जिल्ह्यात आज २१ सेंटिमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील एक ते दोन आठवडे या दोन्ही राज्यात पाऊस जोरदार बॅटिंग करण्याची शक्यता आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
|https://twitter.com/ANI/status/1955460825906549233
उत्तर प्रदेशमध्ये काय आहे वातावरण?
उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात पुढील दोन दिवस प्रचंड पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बिहारमधील देखील अनेक जिल्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा राज्यात देखील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रातील विदर्भात १३ ते १७ ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश देखील पावसाचा जॉर्ड वाढण्याची शक्यता आहे.
कोकणासह ‘या’ जिल्ह्यात पावसाचा हायअलर्ट
राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवस आधी जोरदार सुरु असलेला पाऊस एकदम कमी झाला होता. आता मात्र पुढील काही दिवस राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. हवामान विभागाने त्याबाबत अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.