१. देशभरात अनेक राज्यात पावसाची जोरदार हजेरी
२. उत्तरकाशीत ऑपरेशन धराली
३. दिल्ली यमुना नदीने ओळखली उशीरा पातळी
India Rain News: गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनने सर्व देश व्यापला आहे. अनेक राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण भारतात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. दिल्लीत यमुना नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.
उत्तरकाशीत ढगफुटी झाल्याने तेथे लष्करातर्फे ऑपरेशन धराली राबवले जात आहे. दरम्यान आज देखील हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत आज माध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तापमानात घट होऊ शकते. दिल्ली-एनसीआरसारख्या भागात, नोएडा, गुरुग्राममध्ये पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क केले आहे. तसेच मुसळधार पावसाचा इशारा दिलेल्या राज्यांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट
उतरराखंड राज्यात तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यात १२ ऑगस्टपर्यंत अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तरकाशी येथील दृघटनेत अनेक पर्यटक बेपत्ता आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय लष्कर अत्यंत वेगाने बचावकार्य करत आहे.
दक्षिण भारतात पुराचे संकट
उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये देखील पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये हवामान विभागाने पुराचा धोका निर्माण झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांत रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये देखील रेड अलर्ट जारी केला गेला आहे. तामिळनाडू राज्यात भवानी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. उत्तर प्रदेशमध्ये गंगा आणि यमुना नदीने प्रचंड स्वरूप धारण केल्याने २१ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.