Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 हजार भारतीय विद्यार्थ्यांसाठी फ्रान्सचे दरवाजे खुले; भारत-फ्रान्सचा AI वर मोठा करार

भारत आणि फ्रान्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), उच्च शिक्षण, अंतराळ संशोधन आणि स्टार्टअप्स क्षेत्रातील सहकार्याला नवी चालना देण्यासाठी 'इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन रोडमॅप 2030' जाहीर केला आहे. या करारामुळे भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि उद्योजकांसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 10:36 AM
30 हजार भारतीय विद्यार्थ्यांसाठी फ्रान्सचे दरवाजे खुले; भारत-फ्रान्सचा AI वर मोठा करार

30 हजार भारतीय विद्यार्थ्यांसाठी फ्रान्सचे दरवाजे खुले; भारत-फ्रान्सचा AI वर मोठा करार

Follow Us
Follow Us:
  • 2030 पर्यंत 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षणाची संधी.
  • ‘ट्रस्टेड AI’ विकसित करण्यासाठी भारत-फ्रान्स संयुक्तपणे काम करणार.
  • अंतराळ संशोधन, स्टार्टअप्स आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर.
भारत आणि फ्रान्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण, आरोग्य, अंतराळ संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्याला नवी दिशा देण्यासाठी ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन रोडमॅप २०३०’ जाहीर केला आहे. या रोडमॅप अंतर्गत ‘ट्रस्टेड एआय’ (विश्वसनीय कृत्रिम बुद्धिमत्ता) हा द्विपक्षीय सहकार्याचा प्रमुख आधारस्तंभअसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा दिल्यानंतर हा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे.

अयोध्येचे श्रीराम ‘रामलल्ला’ कसे बनले? प्रभू श्रीरामांना ‘अज्ञान बालक’ बनवून कसा जिंकला रामजन्मभूमीचा खटला? जाणून घ्या

गोपनीयतेचे संरक्षण आणि विश्वासार्हतेवर भर

या रोडमॅपनुसार दोन्ही देश सुरक्षित, पारदर्शक आणि मानवी हक्कांचा आदर करणाऱ्या एआय प्रणाली विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील, ऑनलाइन बालसुरक्षा, चुकीची माहिती रोखणे, गोपनीयतेचे संरक्षण आणि डेटा शेअरिंगसाठी विश्वासार्ह चौकट विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे.

उच्च शिक्षण क्षेत्रात फ्रान्सने २०३० पर्यंत ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट पुन्हा अधोरेखित केले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रतांच्या परस्पर मान्यतेचा विस्तार, संयुक्त पदवी अभ्यासक्रम आणि संशोधन सहकार्याला चालना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ४ आयआयटी मुंबई, दिल्ली, मद्रास, हैदराबाद व आयआयएससी बेंगळुरू यांसह भारतीय संस्थांनी फ्रान्समधील विविध विद्यापीठे आणि उद्योगसमूहांसोबत १९ करार केले आहेत.

यावर दिले लक्ष

  • भारत-फ्रान्स इनोव्हेशन नेटवर्कची स्थापना
  • कानपूरमध्ये एरोनॉटिक्स प्रशिक्षण कॅम्पस उभारणार
  • स्टार्टअप्ससाठी ‘इंडिया फ्रान्स इंनोक्सचेंगे ब्रिज’ सुरू
Indian Ocean Dipole म्हणजे काय? El Nino ला देणार टक्कर; जाणून घ्या भारतावर काय परिणाम होणार?

विविध योजनांना मिळणार बळ

ऊर्जा, हवामान बदल, थ्री डी संगणन, एरोनॉटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्टार्टअप्स या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन व नवोन्मेषाला गती मिळणार आहे. अंतराळ क्षेत्रातही दोन्ही देशांनी सहकार्य वाढवण्याचे ठरवले असून पृथ्वी निरीक्षण, मानवी अंतराळ मोहिमा आणि भविष्यातील लो-अर्थ ऑर्बिट स्पेस स्टेशनसंबंधी संयुक्त उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. या रोडमॅपमुळे भारताच्या ‘विकसित भारत २०४७ आणि फ्रान्सच्या ‘फ्रान्स २०३०’ या महत्त्वाकांक्षी योजनांना बळ मिळणार असून सशोधक, विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: India france innovation roadmap 2030 trusted ai 30 thousand indian students opportunity france

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • France
  • India-France

संबंधित बातम्या

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
1

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
2

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
3

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार
4

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.