India Heavy Rain Alert: आज जरा जपूनच! 'या' राज्यांवर वरूणराजा कोपणार; IMD चा अलर्ट वाचून म्हणाल...
परतीचा पाऊस अनेक राज्यात सक्रिय
हवामान विभागाचा अनेक राज्यांना पावसाचा इशारा
बिहारमध्ये आज रेड अलर्ट जारी
India Weather News: देशभरात आज भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात तर पावसाने कहर केला आहे. परतीचा पाऊस अजूनही अनेक राज्यांमध्ये सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. बिहार राज्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
बिहार राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज पटना आणि गया जिल्हे सोडून बिहारमध्ये सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे जवळपास २ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आज मान्सून साधारण असण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहील व हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस
आज हवामान विभागाने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर जम्मू काश्मीर, पूर्वेकडील राज्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, पुणे, विदर्भ व मराठवाडा भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘या’ राज्यांत होणार मुसळधार
मुंबईसह पुण्यामध्ये त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी गजबजून वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवेगळ्या ठिकाणी (३०-४० किमी प्रतितास) वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.