भारत सरकारकडून आता 'ऑपरेशन सिंधू'ची घोषणा; इराण-इस्रायल संघर्षांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान मध्य पूर्वेत तणाव वाढत आहे. त्यामुळे भारत सरकारने इराणमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना मायदेशात परत आणण्याासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केलं आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, १७ जून रोजी उत्तर इराणमधून ११० भारतीय विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.
Iran-Israel War : खामेनेईंचं गुप्त ठिकाण टार्गेटवर! अमेरिकेला धमकी देताच इस्रायलने डागल्या मिसाईल
इराणमधून रस्त्याने आर्मेनियातील येरेवन येथे पाठवण्यात आलं आहे. तिथून भारतात आणण्यात येणार आहे. तेहरान आणि येरेवनमधील भारतीय दूतावासांशी समन्वय साधण्यात आला. हे विद्यार्थी १८ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी २:५५ वाजता येरेवनमधील झ्वार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका विशेष विमानाने निघाले असून १९ जून रोजी पहाटे नवी दिल्लीत पोहोचणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले की, “ऑपरेशन सिंधू सुरू झाले आहे. इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलं असून १७ जून रोजी उत्तर इराणमधील ११० विद्यार्थ्यांना भारताने सुखरूप बाहेर काढलं. एका विशेष विमानाने येरेवनहून भारताकडे निघाले असून १९ जून च्या पहाटे नवी दिल्लीत पोहोचतील. भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या इराण आणि अर्मेनियाचे आभारही सरकराकडून मानण्यात आले आहेत.
” इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलं आहे. या ऑपरेशन अंतर्गत इराणमधील भारतीय दूतावास भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
इराणमध्ये 50 इस्रायली लढाऊ विमानांनी कहरच केला; IDFचा मोठा दावा, ‘Centrifuge production site’ नष्ट
भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतो. इराणमध्ये असलेल्या नागरिकांनी तेहरानमधील भारतीय दूतावास आणि नवी दिल्लीतील MEA च्या 24×7 नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी राष्ट्राला संबोधित केल्यानंतर काही मिनिटांतच इस्रायली लढाऊ विमानांनी तेहरानच्या लवीझान भागात मीसाईल हल्ला केला. त्यामुळे इराणचं सर्वोच्च नेतृत्त्व इस्रायलच्या रडारवर असल्याचं माणलं जातं आहे. लवीझा खामेनेईंचं गुप्त ठिकाण मानलं जातं. इराणच्या मीडियाने खामेनेईंना सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी हलवलं असल्यांचं म्हटलं होतं.