भारतीय सैन्यदलांनी काय सांगितलं? (फोटो सौजन्य-X)
India Pakistan Ceasefire News in Marathi: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर १० मे रोजी शस्त्रविराम झाला. याचदरम्यान जम्मू-काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात रात्र शांत होती. अलिकडच्या काळात पहिल्यांदाच अशा कोणत्याही घटनेची नोंद झालेली नाही, अशातच आज (12 मे) तिन्ह सैन्यदलांची संयुक्तपत्रकार परिषद घेण्यात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्र विरामानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये पहिल्यांदाच चर्चा होते आहे. भारतातर्फे जनरल राजीव घई चर्चा करत आहेत.
या पत्रकार परिषदेत , पाकिस्तानला आम्ही योग्य शब्दांमध्ये उत्तर दिलं. आपली लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात होती. त्यामुळे ७ मेच्या रात्री आम्ही फक्त दहशतवादी तळांवरच हल्ला केला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. ही लढाई स्वतःची लढाई आहे असं मानून भारताला उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारताने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर दिलं,अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत जनरल राजीव घई यांनी सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन लेसर गनने पाडण्यात आले. तसेच नूर खान एअरबेस नष्ट केला. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांवर अचूक हल्ले केले. पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानासाठी पाक सैन्य जबाबदार आहे. आम्ही सीमा ओलांडल्याशिवाय अचूक हल्ले केले,अशी माहिती राजीव घई यांनी दिली.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये बदल झाला आहे, आपल्या नागरिकांनाही लक्ष्य केले जात आहे. पापाचे हे पात्र पहलगाममध्ये भरले गेले होते. आम्हाला पूर्ण माहिती होती की पाकिस्तानही हल्ला करेल. म्हणूनच आम्ही आमच्या हवाई संरक्षणाची पूर्ण तयारी केली होती. तसेच एअर मार्शल एके भारती पुढे म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने आम्हाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले आणि आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले. आपल्या हवाई संरक्षण दलात प्रवेश करणे अशक्य आहे. आम्ही चिनी क्षेपणास्त्र पाडले.
एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आमची लढाई दहशतवादाविरुद्ध होती, म्हणून आम्ही ७ मे रोजी फक्त दहशतवाद्यांशी लढलो. पण दुर्दैवाने पाकिस्तानी सैन्याने ती स्वतःची लढाई मानली आणि दहशतवाद्यांना पाठिंबा दिला.
दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमधील चर्चेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस, तिन्ही सैन्याचे प्रमुख आणि इतर अनेक अधिकारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी ११ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्च संरक्षण अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल, संरक्षण प्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते.