भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (ANI)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशल सिंदूर राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तामध्ये सीजफायर झाले आहे. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचा शब्द पूर्ण केल्याचे पात्रा म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ” भारत आणि पाकीस्तान लष्करी कारवाई रोखण्यासाठी सिजफायरचा निर्णय घेतला आहे. मात्र भविष्यात पुन्हा असे हल्ले झाल्यास भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल. दहशतवाद्यांना घरात घुसून मारायचे आणि त्यांचा समूळ नाश करायचे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्य होते.”
“पंतप्रधान मोदींचा निर्णय सुरक्षा दलांचे अतुलनीय शौर्याने दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त केली आहेत. हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शब्द होता. ६ ते ७ मे दरम्यान भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यश्वी ठरले आहे. या अंतर्गत भारताने ज्या प्रकारे लष्करी कारवाई केली केली ती कारवाई अभूतपूर्व आहे”, असे संबित पात्रा म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे किती नुकसान?
ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे. संबित पात्रा यांनी भारतीय सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. भारताने केवळ पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे आणि १०० दहशतवादीच नव्हे तर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे ११ एअरबेस नष्ट केले आहेत.
भारतीय सैन्यदलांनी काय सांगितलं?
पाकिस्तानला आम्ही योग्य शब्दांमध्ये उत्तर दिलं. आपली लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात होती. त्यामुळे ७ मेच्या रात्री आम्ही फक्त दहशतवादी तळांवरच हल्ला केला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. ही लढाई स्वतःची लढाई आहे असं मानून भारताला उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारताने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर दिलं,अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.
India Pakistan Ceasefire LIVE: पाकिस्तानने दहशतवाद्यांनना पाठिंबा दिला, भारतीय सैन्यदलांनी काय सांगितलं?
ठार झालेल्या या तीन भयानक दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचा समावेश आहे. १९९९ च्या आयसी-८१४ विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार अझहर होता. तो पाकिस्तानातील बालाकोट येथील जैशच्या प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ दहशतवादी अब्दुल मलिक रौफ देखील मारला गेला. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यांच्या मृत्यूमुळे लष्कराच्या रचनेला मोठा धक्का बसला आहे. तिसऱ्या दहशतवाद्याचे नाव मुदस्सीर अहमद आहे, तो लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य आहे, जो दहशतवाद्यांच्या भरती आणि प्रशिक्षणात सहभागी होता. तो पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सक्रिय होता.