भारत-पाक तणाव निवळला, ३२ विमानतळं आजपासून उड्डाणासाठी सज्ज, पाहा संपूर्ण लिस्ट
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाक संबंध बिघडले होते. दरम्यान दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली असून आज पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक विमानतळं बंद करण्यात आली होती. जवळपास ३२ विमानतळांचा यात समावेश होता. आजपासूनही विमानतळं नागरी उड्डाणांसाठी सज्ज झाली आहेत. भारतीय हवाई दलाच्या सूचनेनुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) संबंधित विनातळांना या संदर्भात नोटीस पाठवली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर मात्र…; थेंब-थेंब पाण्यासाठी तरसणार दहशतवाद्यांचा आश्रयदाता
ही विमानतळं आजपासून सुरू होणार…
उधमपूर,
अंबाला,
अमृतसर,
अवंतीपूर,
बथिंडा,
भुज,
बिकानेर,
चंदीगड,
हलवारा,
हिंदण,
जैसलमेर,
जम्मू,
जामनगर,
जोधपूर,
कांडला,
कांगडा (गग्गल),
केशोड,
किशनगड,
कुल्लू मनाली (भुंटर),
लेह,
लुधियाना,
मुंद्रा,
नालिया,
पठाणकोट,
पटियाला,
पोरबंदर,
राजकोट (हिरासर),
सारसावा,
शिमला,
श्रीनगर,
थोईस आणि
उत्तरलाई
डीजीसीएने १० मे पर्यंत नागरी कामकाज थांबवण्याचे आदेश दिले होते, परंतु आता परिस्थिती सामान्य असल्याने आम्ही विमानतळ उघडण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
११ मे रोजी झालेल्या तिन्ही सैन्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी संपूर्ण माहिती दिली. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की गेल्या ३-४ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या कारवाया युद्धापेक्षा कमी नाहीत.सामान्य परिस्थितीत, एकमेकांच्या देशांचे हवाई दल हवेत उड्डाण करून एकमेकांवर हल्ला करत नाहीत, सहसा नियंत्रण रेषेवरून घुसखोरी दहशतवाद्यांकडून केली जाते. आमच्याकडे माहिती आहे की नियंत्रण रेषेवरून घुसखोरीत पाकिस्तानी सैन्याचाही सहभाग असू शकतो आणि भारताच्या चौक्यांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत करत आहेत.
“जर तिकडून गोळी चालवली तर इकडून गोळा…; युद्धाच्या तणावपूर्ण वातावरणात पंतप्रधान मोदींचे आक्रमक विधान
‘भारताने दिलेल्या प्रत्युत्तर कारवाईत ३५-४० पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत, आम्ही पाकिस्तानी सैन्याला किंवा नागरिकांना लक्ष्य केले नाही, आम्ही फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यांचंही त्यांनी सांगितलं.